जवाहर नवोदय विद्यालयासाठी इयत्ता 11 वी च्या रिक्त जागांसाठी प्रवेश परीक्षा
अलिबाग,दि.15(जिमाका) :- जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर, रायगड येथे शैक्षणिक वर्ष 2023- 24 मध्ये इयत्ता 11 वी च्या रिक्त जागांच्या प्रवेशाकरिता निवड चाचणी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेश अर्ज दि.11 मे 2023 पासून भरण्यास सुरुवात झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये इयत्ता 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच या निवड परीक्षेत बसण्याची संधी मिळेल. ही निवड चाचणी करिता ऑनलाईन प्रवेश अर्ज https://navodaya.gov.in या संकेतस्थळावर नि:शुल्क उपलब्ध आहेत. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 मे 2023 आहे, अशी माहिती जवाहर नवोदय विद्यालयाचेचे प्राचार्य के. वाय. इंगळे यांनी दिली आहे. 0000000