रायगड जवाहर नवोदय विद्यालयाचे केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड परीक्षेत घवघवीत यश
अलिबाग,दि.15(जिमाका) :- केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (C.B.S.E.) यांनी दि.12 मे 2023 रोजी घोषित केलेल्या इयत्ता 10 वी आणि इयत्ता 12 वी (विज्ञान शाखा) या दोन्ही वर्गाच्या निकालात जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर, रायगड यांनी घवघवीत यश संपादित केले आहे.
शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर, रायगड चे एकूण 76 विद्यार्थी इयत्ता दहावी तर 34 विद्यार्थी इयत्ता बारावी परीक्षेकरिता बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले असून दोन्ही इयत्तांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
इयत्ता 10 वीत प्रथम क्रमांक साक्षी अनिल कराड (93.40 टक्के) आणि प्रणेश पांडुरंग मोरे (93.40 टक्के), द्वितीय क्रमांक सिद्धार्थ सचिन घरात (93.20 टक्के) आणि दीप्ती सिंग (93.20 टक्के) तर तृतीय क्रमांक संचित सुभाष कासारे (93 टक्के) आणि श्रीजित श्रवणकुमार जैसवार (93 टक्के) यांनी प्राप्त केला आहे.
इयत्ता 12 वीत प्रथम क्रमांक प्रियांशू दिनेश शुक्ला (85.20 टक्के), द्वितीय क्रमांक जयेश दीपक बाविस्कर (80.80 टक्के) तर तृतीय क्रमांक कार्तिक वरुण शर्मा (79.80 टक्के) यांनी प्राप्त केला आहे.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या इयत्ता 10 वी आणि 12 वी च्या सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. त्याबद्दल सर्व शिक्षक, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे प्राचार्य श्री.के.वाय.इंगळे यांनी अभिनंदन केले आहे.
0000000
Comments
Post a Comment