जवाहर नवोदय विद्यालयासाठी इयत्ता 11 वी च्या रिक्त जागांसाठी प्रवेश परीक्षा


 

अलिबाग,दि.15(जिमाका) :- जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर, रायगड येथे शैक्षणिक वर्ष 2023- 24 मध्ये इयत्ता 11 वी च्या रिक्त जागांच्या प्रवेशाकरिता निवड चाचणी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेश अर्ज दि.11 मे 2023 पासून भरण्यास सुरुवात झाली आहे.

शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये इयत्ता 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच या निवड परीक्षेत बसण्याची संधी मिळेल. ही निवड चाचणी करिता ऑनलाईन प्रवेश अर्ज https://navodaya.gov.in या संकेतस्थळावर नि:शुल्क उपलब्ध आहेत. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 मे 2023 आहे, अशी माहिती जवाहर नवोदय विद्यालयाचेचे प्राचार्य के. वाय. इंगळे यांनी दिली आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन