Posts

ग्रामविकास अंतर्गत रायगड जिल्ह्यात उत्तम काम ग्रामीण विकास मंत्रालय संचालक यश पाल यांचे गौरोवोद्गार

    अलिबाग,दि.30(जिमाका):-  केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अतिरिक्त महासंचालक उषा पोळ व संचालक यश पाल यांनी केंद्रीय ग्रामविकास अंतर्गत रायगड जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी रायगड जिल्ह्यात ग्रामविकास अंतर्गत उत्तम काम करण्यात आले असून, या पुढील कालावधीतही असेच काम करावे, असे गौरोवोद्गार यश पाल यांनी काढले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात केंद्रीय ग्रामविकास अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सुरबा नाना टिपणीस सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सुरुवातीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी रायगड जिल्ह्याची भौगोलिक माहिती दिली. तसेच जिल्ह्यात ग्रामीण विकासाच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली. यानंतर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अतिरिक्त महासंचालक उषा पोळ व संचालक यश पाल यांनी योजनानिहाय कामांचा आढावा घेतला. यामध्ये घरकुल योजना, रोजगार हमी योजना, वृक्षलागवड, स्वच्छ भारत मिशन, जळजीवन मिशन, बचत गट यांसह विविध योजनांचा आढावा घेत...

जिल्ह्याच्या प्राणी क्लेश सोसायटीच्या व्यवस्थापन समितीवर अशासकीय सदस्यांच्या नेमणुकीसाठी पात्र इच्छुक व्यक्ती/संस्थांनी अर्ज सादर करावेत

  अलिबाग,दि.30(जिमाका):- रायगड जिल्ह्याच्या प्राणी क्लेश सोसायटीच्या व्यवस्थापन समितीवर अशासकीय सदस्यांच्या नेमणूका करण्याविषयी शासनाच्या कृषी पदुम विभागाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. या समितीवर रायगड जिल्ह्यातील शासनमान्य गोशाळा पांजरापोळ यांच्याकडील एक सदस्य, प्राणी कल्याणासाठी झटणाऱ्या विश्वस्त संस्थाकडून दोन सदस्य तसेच प्राण्यांबाबत मानवतावादी कार्य करणारे, प्राणी प्रेमी यांच्यातून 5 ते 6 सदस्यांची नेमणूक करावयाची आहे.     याकरिता रायगड जिल्ह्यातील गोशाळा, पांजरापोळ प्राण्याविषयी कार्य करणाऱ्या विश्वस्त संस्था, प्राण्याबाबत मानवतावादी कार्य करणाऱ्या पात्र इच्छुक व्यक्ती, संस्थांनी जवळच्या पशुवैद्यकीय संस्था, पंचायत समितीकडील पशुसंवर्धन विभाग, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त रायगड-अलिबाग यांच्याशी संपर्क करुन अर्ज प्राप्त करुन घ्यावा.      अर्ज दि.15 जुलै 2023 पर्यंत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त रायगड-अलिबाग कार्यालयाकडे सादर करावा. अर्जासोबत त्यांनी केलेल्या प्राणी कल्याण विषयक कार्याबाबतचे अनुभव प्रमाणपत्र...

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 66 मि.मी.पावसाची झाली नोंद

  अलिबाग,दि.30 (जिमाका):-  रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 66.00 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग-33.08 मि.मी., पनवेल- 63.06 मि.मी.,कर्जत-72.01 मि.मी., खालापूर- 47.00, उरण-43.09 मि.मी., सुधागड-78.08 मि.मी., पेण-55.08 मि.मी., महाड-91.06 मि.मी. माणगाव- 62.04 मि.मी., रोहा- 86.07 मि.मी., पोलादपूर- 95.06 मि.मी, मुरुड- 66.08 मि.मी., श्रीवर्धन- 66.05 मि.मी., म्हसळा-82.00 मि.मी., तळा- 66.09 मि.मी. 0000000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 96 मि.मी.पावसाची झाली नोंद

  अलिबाग,दि.29(जिमाका):-  रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 96.9 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग-161.01 मि.मी., पनवेल- 87.03 मि.मी.,कर्जत-67.05 मि.मी., खालापूर- 63.06, उरण-103.03 मि.मी., सुधागड-78.03 मि.मी., पेण-109.03 मि.मी., महाड-86.05 मि.मी. माणगाव- 70.03 मि.मी., रोहा- 75.08 मि.मी., पोलादपूर- 78.01 मि.मी, मुरुड- 141.01 मि.मी., श्रीवर्धन- 118.05 मि.मी., म्हसळा-71.09 मि.मी., तळा- 105.05 मि.मी. 0000000

ग्राहकांच्या बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी "बँक ऑफ इंडिया" कटिबध्द --कार्यकारी निर्देशक सूब्रात कुमार

Image
  अलिबाग,दि.29 (जिमाका):- ग्राहकांच्या बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी बँक ऑफ इंडिया, शाखा अलिबाग कटिबध्द असल्याचे प्रतिपादन बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी निर्देशक सूब्रात कुमार यांनी येथे केले.                   बँक ऑफ इंडिया, अलिबाग शाखेचे (दि.19 जून) रोजी नवीन जागेत स्थलांतर झाले असून त्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.              यावेळी नॅशनल बँकिंग समूह पश्चिम विभागाचे महाप्रबंधक श्री.सुब्रतो कुमार रॉय, रायगड विभागाचे विभाग प्रमुख श्री. मुकेश कुमार, उपविभाग प्रमुख श्री.जॉन लोबो, अग्रणी बँक प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी, शाखाधिकारी सनी बर्नवाल,  नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी श्री. प्रदीप अपसुंदे तसेच विभागीय कार्यालयाचे पदाधिकारी आणि ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.              यावेळी बोलताना सूब्रात कुमार म्हणाले की, बँकिग सुविधा सुधारण्याबरोबर  कृषी...

पाणी बचतीसाठी कटिबद्ध होवू या... राष्ट्रीय कर्त्यव्य पार पाडू या..! -- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील

  अलिबाग,दि.29 (जिमाका):-  रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडून देखील काही प्रमाणात पाणी टंचाई जाणवतेच. याला अनेक कारणे असली तरी वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकीकरण, वाढते नागरिकीकरण, यामुळे पाण्याचा दरडोई वापर देखील वाढला आहे. प्रदूषणामुळे पाण्याचे स्त्रोत दूषित होत आहेत. आता हे टाळण्यासाठी सर्वांनी मिळून पाणी बचतीसाठी कटिबद्ध होवू या... राष्ट्रीय कर्तव्य पार पाडू या.., असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.    जिल्ह्यात ग्रामीण भागात  पाण्याचा काटकसरीने वापर, "पाणी अडवा पाणी जिरवा" मोहीम राबविणे व पाण्याच्या काटकसरीने वापराबरोबरच या नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करण्यासाठी डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध अभिनव उपक्रम व कृतीशील पाऊले उचलली जात आहेत.    अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सत्यजित बडे, ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक श्रीमती प्रियदर्शिनी मोरे, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी  राजेंद्र भालेराव व पाणी व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी श्रीमती शुभांगी नाख...

पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

अलिबाग,दि.29 (जिमाका):- वादळी व संततधार पाऊस किंवा अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या विजेच्या तारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्किट आदींमुळे वीज अपघाताची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सतर्क राहावे. तसेच पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती, धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा स्थितीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने केले आहे.              अतिवृष्टी, वादळी पाऊस आदिंमुळे तुटलेल्या विजेच्या तारा, विजेचे खांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर, रोहित्रांचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीच बोर्ड, विद्युत यंत्रणेजवळील इतर ओलसर वस्तू, इतर साहित्य आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असते. पाणी हे विजेचे वाहक असल्याने पावसाळयात विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव ...