Posts

जिल्हास्तरीय माहिती प्रशिक्षण व संपर्क मेळावा पशुपालकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा

  रायगड(जिमाका) दि.10:-   जिल्हा परिषद रायगड पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद रायगड येथे दि. 13 फेब्रुवारी 2024  रोजी केंद्र पुरस्कृत अस्कॅड  (ASCAD)  योजनेंतर्गत माहिती प्रशिक्षण व संपर्क घटक योजनेंतर्गत जिल्हास्तरीय माहिती प्रशिक्षण व संपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यास जास्तीत जास्त पशुपालकांनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे, आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले  आहे. या मेळाव्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ.भरत बास्टेवाड, प्रादेशिक सहआयुक्त (पशुसंवर्धन) मुंबई विभाग, मुंबई डॉ.प्रशांत कांबळे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे  उपस्थित राहून पशुपालकांना मार्गदर्शन करणार आहेत.  या मेळाव्यामध्ये पशुधनातील विविध रोग प्रादूर्भाव व त्यांचे  नियंत्रण, पशुधनातील लसीकरणाचे महत्त्व, भारत पशुधन प्रणालीद्वारे पशुधनाची नोंदणी तसेच प्राण्यांपासून माणसांना व माणसांपासून प्राण्यांना होणाऱ्या रोगांबाबत (  ZONOTIC DISEASES )प्रामुख्याने  बर्ड फ्लू ,  ग्लॅन्डर्स ,  रेबीस इत्यादी बाबत जन...

एच.आय.व्ही. एड्स व लैंगिक आजाराबाबत लोककलेतून प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी केली अलिबागमध्ये जनजागृती

  रायगड(जिमाका)दि.10:-   जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय,रायगड अंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ.अंबादास देवमाने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक अलिबाग व जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग या ठिकाणी  एचआयव्ही एड्स व लैंगिक आजाराबाबत लोककलेचा माध्यमातून प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या वतीने जनजागृती करण्यात आली. स्थलांतरित कामगार व स्थानिक युवकांना, नागरीकांना लैंगिक आजाराबाबतचे सविस्तर मार्गदर्शन तसेच एचआयव्हीची लागण महत्त्वाचा चार कारणांमुळे होते जसे एचआयव्ही व्यक्तीसोबत असुरक्षित लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याने, एच आय व्ही व्यक्तीची सुई व सिरिंज चा वापर केल्याने, एचआयव्ही गर्भवती मातेपासून होणाऱ्या बाळाला लागण होते. तसेच रक्त पेढीतुन एच आय व्ही मुक्त रक्त न घेतल्या मुळे एचआयव्ही ची लागण होऊ शकते. म्हणून प्रत्येक नागरिकांनी शासकीय दवाखान्यातील समुपदेशन व तपासणी केंद्रातून एचआयव्हीची तपासणी करणे आवश्यक आहे, असे कलाकारांनी आपल्या पथनाट्यातून सांगितले. त्याचबरोबर लैंगिक आजरा विषयी काही शंका अ...

13 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड

  रायगड(जिमाका)दि.10:-  राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्यातील 1 वर्ष ते 19 वर्ष वयोगटातील 5 लाख 44 हजार 396 मुलामुलींना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहिम मंगळवार, दि.13फेब्रुवारी 2024 रोजी राबविण्यात येणार असून या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा विखे यांनी केले आहे.  त्याकरिता 6 लाख अल्बेडॅझोल गोळ्या वितरीत करण्यात आल्या आहेत. 3 हजार 518 शाळा, 3 हजार 322 अंगणवाड्यांमधून अल्बेडॅझोल गोळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जंतनाशक गोळ्या देण्याची मोहिम यशस्वी करण्याकरिता ग्रामीण भागातील एकूण 54 प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच 280 आरोग्य उपकेंद्रे या ठिकाणी कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका सहभाग नोंदविणार आहेत. तसेच शहरी भागामध्ये जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रूग्णालय यांच्यामार्फतही मोहीम राबविण्यात येणार आहे. जंत दोषामुळे बालकांमध्ये ऍनिमियाचा सर्वाधिक धोका उद्भव...

रायगड महासंस्कृती महोत्सव-2024 चे 12 ते 16 फेब्रुवारी दरम्यान आयोजन महोत्सवास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-- जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे

Image
  रायगड(जिमाका)दि.9:-  सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आणि रायगड जिल्हा प्रशासन आयोजित रायगड महासंस्कृती महोत्सव-2024 चे दि.12 फेब्रुवारी ते दि.16 फेब्रुवारी या कालावधीत सायंकाळी 4 ते रात्रौ 10 वाजेपर्यंत पोलीस परेड मैदान अलिबाग येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  या महोत्सवास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी केले आहे. आगरी, कोळी संस्कृतीसह विविध लोककला याबरोबरच विशेष निमंत्रितांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन दि.12 फेब्रुवारी रोजी उद्योग मंत्री तथा पालकमंत्री श्री.उदय सामंत आणि महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. सायंकाळी 4 ते 6 यावेळेत अलिबाग येथील स्थानिक कलाकारांचा शिवकालीन संस्कृती दर्शविणारा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये मर्दानी खेळ, पोवाडे यांचा समावेश आहे. तर सायंकाळी 7 ते रात्रौ 10 या वेळेत अवधूत गुप्ते यांचा संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे. दि.13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 ते 6 यावेळेत अलिबाग येथील स्थानिक कला...

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित चार हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार राज्यातील पाच हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार-उद्योगमंत्री रायगड जिल्ह्यातील 4 उद्योगांना राज्य निर्यात पुरस्कार प्रदान

Image
    रायगड(जिमाका)दि.8:-  उद्योजकांनी महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखविला असून आज सुमारे 4 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या माध्यमातून सुमारे 5 हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतील, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. वाकड येथील हॉटेल टिपटॉप येथे आयोजित महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे वितरण तसेच देशातील 24 तज्ज्ञ संस्थासोबत करण्यात आलेल्या सामंजस्य करार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, उद्योगविकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अपर उद्योग आयुक्त प्रकाश वायचळ, अपर उद्योग संचालक संजय कोरबु, उद्योग सह संचालक शैलेश रजपूत आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील मे.नाईक ओशियनिक एक्सपोर्टस् प्रा.लि., एम,5,एमआयडीसी,तळोजा,मे. एच के एस एमपेक्स,प्लॉट नं3, पनवेल इंडस्ट्रीयल को-ऑप इस्टेट लि., नवी मुंबई फायनरी, मे.गंधार ऑईल  फायनरी (इंडिया), टी-10, एम.आय.डी.सी. तळोजा ता. पनवेल,  मे. कपुर ग्लास इंडिया प्रा. लि. , 200/201/212 ,...

डी.एल.एड्. परीक्षा डिसेंबर-2023 निकाल जाहीर उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करावेत

    रायगड(जिमाका)दि.8:-  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डी.एल.एड्. डिसेंबर-2023 परीक्षेचे आयोजन दि. 13 डिसेंबर 2023 ते 21 डिसेंबर 2023 या कालावधीत करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल दि. 07 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 02.00 वाजता परिषदेच्या संकेतस्थळावर ( www.mscepune.in ) जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित अध्यापक विद्यालयामार्फत यथावकाश हस्तपोच मिळेल व उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागणीसाठी दि.22 फेब्रुवारी 2024 अर्ज करावेत, असे आवाहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, अनुराधा ओक यांनी केले आहे. 0000000

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिचंन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे कोकण विभागासाठी वरदान

       रायगड(जिमाका)दि.8:-  राज्याच्या विविध भागात पावसाचे होणारे असमान वितरण आणि पावसातील अनिश्चित येणारे खंड या नैसर्गिक अडचणीमुळे सिंचनाअभावी पिक उत्पादनातील घट टाळण्यासाठी पावसाचे पाणी साठविण्यासाठी शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिचंन योजनेचा विस्तार करून या योजनेमध्ये वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश केला आहे. कोकण विभागासाठी एकूण 855 लक्षांक असून यामध्ये ठाणे -125, पालघर-120, रायगड-210, रत्नागिरी-210, सिंधुदुर्ग-190 शेततळयांचा समावेश आहे. लाभार्थीसाठी पात्रता पुढीलप्रमाणे :-  अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान 0.20 हेक्टर जमीन आवश्यक आहे, क्षेत्रधारणेस कमाल मर्यादा नाही, अर्जदार शेतकऱ्यांची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक राहील, अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरीता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. लाभार्थी निवड  :- महाडीबीटी पोर्टलवर ( mahadbtmahait.gov ) मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिचंन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकासाठी अ...