Posts

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना तरुण-तरुर्णीना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी

  रायगड(जिमाका)दि. 18:- राज्याच्या नवीन औद्योगिक धोरण-2019 अंतर्गत अनेक नाविन्यपूर्ण योजना व कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने हाती घेतले आहेत. सूक्ष्म व लघु उपक्रमांना चालना देण्यासाठी तसेच राज्यात व्यापक प्रमाणात रोजगाराच्या संधी स्थानिक ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना जाहीर केली आहे. योजनेचा उदेश-राज्यातील युवक/युवतींच्या सर्जनशिलतेला वाव मिळून राज्यात स्वयंरोजगारास पूरक वातावरण तयार करणे, त्याद्वारे राज्यात ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रात सूक्ष्म, लघु उपक्रमांद्वारे व्यापक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी शासनाच्या आर्थिक सहाय्यातून प्रकल्प उभारणीस हातभार लावणे, पात्रता व अटी :- राज्यात स्थानिक अधिवास असलेल्या व किमान 18 से 45 वयोगटातील स्वयंरोजगार करू इचिछणारे उमेदवार. विशेष प्रवर्गासाठी (अनुसूचित जाती,जमाती,महिला,अपंग,माजी सैनिक,इ.मा.व.,वि.जा.,अ.ज.,अल् पसंख्याक) 5 वर्षांची अट शिथिल,  रु. 10 लाखावरील प्रकल्पांसाठी किमान शैक्षणिक पात्रता 7 वी पास व रू. 25 लाखांवरील प्रकल्पांसाठी किमान 10 वी पास, अर्जदाराने यापूर्वी अनुदान समाविष्ट असलेल्या रा...

दि.17 ते दि.30 डिसेंबर पर्यंत मुख्यमंत्री रोजगार योजना गतिमानात पंधरवड्याचे आयोजन

      रायगड(जिमाका)दि. 18:- उद्योग सहसंचालक, कोकण विभाग,ठाणे यांनी पंधरा दिवस  दि. 17 ते 30 डिसेंबर 2024 पर्यंत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा गतिमानता पंधरवाडा घोषित केला आहे. हा पंधरवाडा यशस्वी होण्यासाठी रायगड जिल्ह्यातील तालुक्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेची जनजागृती मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळ्या यांनी दिली आहे  जिल्ह्यातील महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था इत्यादी ठिकाणी जनजागृती मेळाव्यात प्रचार व प्रसिध्दी करुन पात्र लाभार्थ्यांचे जागेवर अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कौशल्य उद्येाजकता विकास विभाग,आरसेटी, एमसीईडी, मिटकॉन, इ. संस्थे द्वारे उद्येाजकता विकास प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या युवक/युवतीचे, जिल्ह्यातील औद्योगिक समुह विकास घटक, एक ‍जिल्हा एक उत्पादन (ODOP) तसेच भौगोलिक मांनाकन प्राप्त उद्योजकांचे अर्ज प्राधान्याने या पंधरवाड्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत घेण्यात येणार आ...

निवडणूक मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

    रायगड,दि.21, (जिमाका):-विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणुकीच्या  मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी तयार झाली आहे. याकरिता 181 मतमोजणी पर्यवेक्षक, 204 मतमोजणी सहाय्यक, 165 मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक, 183 इतर पथकातील अधिकारी (वर्ग-2), 986 इतर पथकातील अधिकारी (वर्ग-3), 734 चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशी एकूण 2 हजार 453 अधिकारी, कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.      188- पनवेल   अे.आर.कालसेकर पॉलिटेक्नीक कॉलेज, पनवेल, ठाणा नाका जवळ, कर्नाळा स्पोटर्स ॲकेडमी समोर, पनवेल येथे  मतमोजणी  होणार असून मतमोजणीसाठी  येथे  टेबलची संख्या  24  आहे. मतमोजणीच्या एकूण फेऱ्यांची संख्या  25  आहे.   मतमोजणी पर्यवेक्षक 38, मतमोजणी सहाय्यक 38, मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक 38, इतर पथकातील अधिकारी (वर्ग-2) 45, इतर पथकातील अधिकारी (वर्ग-3) 310, चतुर्थ श्रेणी कर्मचारी 220 तर मतमोजणीसाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून श्री.दुनी चंद्र राणा यांची  नियुक्ती करण्यात आली आहे.   189- कर्...

दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी "इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर" दक्ष

    रायगड,दि.18(जिमाका):   महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू आहे. येत्या बुधवारी म्हणजे 20 नोव्हेंबर 2024 रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि निर्भय वातावरणात व्हावी,   यासाठी भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्याकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणुकांसंबंधित प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्र (ईएमएमसी) स्थापित करण्यात आले आहे. महाराष्ट्रात दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी होत असलेल्या मतदान दिनी तसेच मतदान दिवसाच्या एक दिवस आधी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवण्याचे काम भारत निवडणूक आयोगाकडून होणार आहे. दूरचित्रवाणीवरून प्रसारित झालेल्या बातमीमध्ये निवडणुकीबाबत काही दखलपात्र मजकूर,   दृश्य,   बातमी असल्यास संबंधित जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेकडून तत्काळ दखल घेतली जात आहे. यासाठी मुंबई येथे राज्यस्तरीय माध्यम देखरेख व संनियंत्रण...

निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध

   रायगड,दि.18 (जिमाका): भारत निवडणूक आयोगामार्फत विधानसभा निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.  भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार सदर  अधिसूचना  महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. या नुसार राज्यात 13 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजल्यापासून 20 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंतच्या कालावधीत एक्झिट पोल आयोजित करणे, त्यांचे कोणत्याही माध्यमातून प्रसारण करणे, एक्झिट पोलचे निकाल जाहीर करणे यावर प्रतिबंध राहील असे स्पष्ट केले आहे. उमेदवारांकडून  वृत्तपत्रांमध्ये देण्यात येणाऱ्या जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण करुन घेणे बंधनकारक. उमेदवारांना मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे 19 नाव्हेंबर व मतदानाच्या दिवशी म्हणजे 20 नोव्हेंबर 2024 रोजी वृत्तपत्रांमध्ये द्यावयाच्या जाहिरातींचे माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड यांच्याकडून ...

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज नागरिकांनी मताधिकार बजावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Image
  रायगड,दि.18(जिमाका):-  रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदार संघांसाठी दि.20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निःपक्ष, निकोप आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी  निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. तरी  मतदारांनी  निर्भय होऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले. अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवडणूक मतदान पूर्व तयारीबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.  याप्रसंगी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व पत्रकारांशी जिल्हाधिकारी श्री.जावळे बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी निवडणूक पूर्वतयारीबाबत माहिती देताना, मतदार माहिती चिठ्ठीचे 98 टक्के वितरण झाले आहे असे सांगून मतदानासाठी ‘छायाचित्रासह मतदार ओळखपत्रासह’पर्यायी 12 पैकी कोणतेही एकओळखपत्र दाखवून मतदान करता येईल. जिल्हा प्रशासनाने मतदारांना मतदान करणे सुलभ व्हाव...

सर्व यंत्रणांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन समन्वयाने काम करावे --विभागीय आयुक्त राजेश देशमुख

Image
  रायगड(जिमाका)दि.15:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये सर्व शासकीय विभागांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन समन्वयाने काम करावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राजेश देशमुख यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, अपर पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मी नांदेडकर, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बढे, निवासी उजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे यांसह  विविध समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त राजेश देशमुख मार्गदर्शन करताना म्हणाले की, निवडणूकीतील प्रत्येक दिवस महत्वाचा असून ही निवडणूक इतर निवडणूकीपेक्षा वेगळी आहे.  निवडणूक आयोगाने आपल्याला ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. मतांची टक्केवारी वाढावी यासाठी दिव्यांग मतदार, 85 वर्ष वयावरील ज्येष्ठ न...