Posts

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न खरीप हंगामात कृषी विभागाने शेतकऱ्यांना खते व बियाणांचा पुरवठा सुरळीत होण्याची दक्षता घ्यावी --जिल्हाधिकारी किशन जावळे

Image
             रायगड (जिमाका)दि.8 :- आगामी खरीप हंगाम लक्षात घेता बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध असण्याच्या दृष्टीने परिपूर्ण नियोजन करा तसेच कोणत्याही परिस्थितीत खते, बियाणे यांची टंचाई भासणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.             जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री.जावळे बोलत होते. बैठकीला खा.धैर्यशील पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी जिल्हा सत्यजित बढे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे आदी उपस्थित होते.             खरीप हंगामामध्ये बियाणे आणि खतांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर जाणवतो. त्यामुळे या दोन्हीचे नियोजन आवश्यक आहे. पिक पेरणी क्षेत्राला आवश्यक असणाऱ्या बियाण्यांची उपलब्धता होण्यासाठी कृषी विभागाचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. गुणनियंत्रण विभागाने दक्ष राहून बोगस बियाणे, खतांची विक्री होणार नाही याबाबतची दक्षता घ्य...

पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय नवीन ठिकाणी स्थलांतरीत

  रायगड,(जिमाका)दि.06 :-      प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), पनवेल हे कार्यालय दि. 5 मे 2025 पासून प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल,व्हॅली शिल्प को-ऑप. हौ.सो.,बिल्डिंग क्र. एच-1, दुसरा मजला,सेक्टर 36, खारघर नोड,ता. पनवेल, जि. रायगड – 410210 ई-मेल:  rto.46-mh@gov.in  येथे नवीन ठिकाणी स्थलांतरित झाले आहे. नवीन पत्त्यावर सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरु झाले असून नागरिकांना सर्व संबंधित कामांसाठी नवीन पत्त्यावरच संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल जयंतकुमार पाटील यांनी केले आहे. 000000

पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करावेत

    रायगड,(जिमाका)दि.06 :-    नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप करणे ,  शेळी-मेंढी गट वाटप करणे ,  1000 मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे ,  100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25+3 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2025-26 या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी ,  पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक/शेतकरी बांधव ,  सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज  करावेत, असे  आवाहन  जिल्हा  पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सचिन देशपांडे यांनी केले आहे. योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील  https://ah.mahabms.com   या संकेतस्थळावर तसेच  AH-MAHABMS (Google play Store  वरील मोबाईल अॅपवर उपलब्ध )  मोबाईल अॅपवर...

जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Image
  रायगड,(जिमाका)दि.1 :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या दिनानिमित्त  जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उप वनसंरक्षक राहुल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण डॉ.रविंद्र शेळके, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) भारत वाघमारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) भरत वाघमारे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 0000000

कान्होजी आंग्रे वनउद्यान अलिबाग येथे वन कट्टाचे उद्घाटन संपन्न

Image
    रायगड,(जिमाका)दि.1 :- महाराष्ट्र शासनाच्या वनविभाग-अलिबागतर्फे आयोजित  “ वन कट्टा ”  या अनोख्या उपक्रमाचे  उद्घाटन महिला व बालविकास मंत्री  कु.आदिती वरदा सुनिल तटकरे यांच्या हस्ते संपन्न  झाले. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे, उप वनसंरक्षक राहुल पाटील यांसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी,ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.             कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक वनसंरक्षक भाऊसाहेब जवरे, व वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. ०००००

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उदघाटन रायगड जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांसाठी उपयुक्त - महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे

Image
    रायगड(जिमाका)दि.1:-  राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे  महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.  यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक निशिकांत पाटील, अतिरिक्त शल्य चिकित्सक शीतल जोशी, उपजिल्हा धिकारी डॉ.रविंद्र शेळके यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राज्यातील गरजू रूग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यासंदर्भात 22 फेब्रुवारी 2025 रोजी शासन निर्णय काढण्यात आला. शिवाय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाची 23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती, या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय मुख्यम...

महाराष्ट्र दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांच्याहस्ते राष्ट्रध्वजवंदन

Image
  रायगड (जिमाका) दि.1:- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान येथे आयोजित समारंभात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्वजवंदन  करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे यांसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी,ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी राष्ट्रगीतानंतर पोलीस वाद्यवृंद पथकाकडून महाराष्ट्र राज्यगीत धून वादन करण्यात आली. राष्ट्रध्वजाला पोलीस संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. संचलनाचे नेतृत्व यांनी केले. पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल, वाहतूक शाखा, गृहरक्षक दल,  गुन्हे शाखेचे श्वान पथक, पोलीस दलाचे डायल- 112 पोलीस वाहन, दंगल नियंत्रण वाहन, जलद प्रतिसाद पथक,  अग्नीशमन दल, वैद्यकीय सेवेच्या डायल 108 सेवेतील वाहन आदींनी यावेळी संचलनात भाग घेतला. जिल्हा व राज्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान द्यावे- महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे समाजातील प्रत्येक घटका...