महाड दुर्घटनेतील बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाईकांना विभागीय आयुक्तांचा दिलासा
|
महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती
कार्यालय, रायगड-अलिबाग
|
||
|
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
|
|
Twitter-@dioraigad
Facebook-dioraigad
|
दिनांक :- 05 ऑगस्ट, 2016 वृत्त क्र.477
महाड दुर्घटनेतील बेपत्ता
व्यक्तींच्या
नातेवाईकांना विभागीय
आयुक्तांचा दिलासा
अलिबाग दि.05 :-
महाड येथे सावित्री नदीवरील पुल वाहून गेल्यामुळे झालेल्या दुर्घटना परिसरात
विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी आज पाहणी केली. तसेच येथे सुरु करण्यात
आलेल्या नियंत्रण व मदत कक्षात जमलेल्या बेपत्ता व्यक्तींच्या नातेवाईकांसमवेत
चर्चा करुन त्यांना दिलासा दिला. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले, जिल्हा
पोलीस अधिक्षक मो.सुवेज हक, उपविभागीय अधिकारी श्रीमती सुषमा सातपुते, तहसिलदार
संदिप कदम होते.
महाड येथे घडलेली
ही दुर्घटना अत्यंत दुर्देवी असून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे हे प्रशासना समोर
असलेले महत्वाचे कार्य आहे. प्रशासन बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी शर्थीचे
प्रयत्न करीत आहे. त्यासाठी सर्वस्तरावरुन
शोधकार्यास मदत होत आहे. सर्वांनी प्रसंगावधान राखून संयम ठेवणे आवश्यक आहे. प्रशासन
आपल्या सोबत असल्याचे सांगून त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित बेपत्ता व्यक्तींच्या
नातेवाईकांना दिलासा दिला. तसेच शोध पथकाबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक
यांच्याशी चर्चा करुन मार्गदर्शन केले.
000000

Comments
Post a Comment