महाअवयवदान एक महत्वपूर्ण अभियान
|
महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती
कार्यालय, रायगड-अलिबाग
|
||
|
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
|
|
Twitter-@dioraigad
Facebook-dioraigad
|
दिनांक 29 ऑगस्ट 2016 लेख : 25
महाअवयवदान
एक महत्वपूर्ण अभियान
|
अवयवदानासंदर्भात
समाजात जनजागृती होण्यासाठी 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2016 या कालावधीत महा
अवयवदान अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या संदर्भात सर्वसामान्यांना
माहिती होऊन ते अवयवदानासाठी पुढे यावेत याकरिता जनजागृती करण्यात येत आहे. आज
आपण पाहत आहोत की अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मानवी अवयव प्रत्यारोपण करुन
विविध गंभीर आजारावर उपचार साध्य होत आहेत.
त्यामुळे मृत्यू पश्चात आपण केलेले अवयवदान हे एखाद्याला जीवनदान
दिल्यासारखे आहे.
अशा या
महत्वपूर्ण अभियानाबद्दल या काही प्रतिक्रिया…
|
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहनिर्माणमंत्री
प्रकाश महेता यांच्या अध्यक्षतेखाली अवयवदान महा अभियान संदर्भात स्थापित करण्यात
आलेल्या समितीची नुकतीच बैठक झाली. त्यात
उपस्थित मान्यवरांनी आपली मते मांडून अवयवदान
मोहिम अधिक व्यापक करण्याबाबत सूचना केल्या. त्या संदर्भात मान्यवरांची ही
काही मते.…
पालकमंत्री
प्रकाश महेता -
अवयवदान हे जीवनदान देणारे आहे. अवयवदान महा
अभियानानिमित्त मी रायगड जिल्ह्यातील सर्व
बंधू-भगिनींना असे आवाहन करतो की, या महाअभियानात आपण आपला अवयवदानाचा संकल्प
करावा व स्वत:पुढाकार घेऊन अवयवदानाचा अर्ज
भरुन द्यावा. तसेच कुटूंबाने देखील आपल्या
आप्तांच्या अवयवदानाच्या संकल्पनेचा आदर करुन त्यांच्या पश्चात अवयवदानासाठी पुढे यावे.
अवयवदानाचा संकल्प जरी लाखोंच्या संख्येने झाला तरी प्रत्यक्षात होणारे
अवयवदान हे फार कमी आहे. अशावेळी
कुटूंबाची जबाबदारी महत्वाची आहे. आपल्या
अवयवदानाने एखाद्या व्यक्तीसोबंत आपण पर्यायाने त्याच्या कुटूंबांला देखील जीवनदान
दिल्या सारखे आहे. शासनाने अवयवदाना
अंतर्गत अधिकाअधिक सुविधांसाठी ग्रीन कॉरिडॉर दिलेला आहे. तेव्हा आपण सर्व मिळून
अवयवदानाचा संकल्प करु आणि गरजूचा जीव वाचवू.
खासदार
श्रीरंग बारणे
महाराष्ट्र
शासनाने अतिशय महत्वपूर्ण असे हे अभियान राबविले असून रायगड जिल्ह्यातील
प्रत्येकाने या अभियानात सहभागी व्हावे. कारण अपघातामध्ये किंवा अन्य कारणासतव
शरीराचा एकदा अवयव जर निकामी झाला तर ती व्यक्ती एका अर्थाने जीवंतपणीच मृत
होते. मात्र अवयवदानाने त्यास आपण
पुर्न:जन्माचा आनंद देऊ शकतो. शासनाच्या
या अभियानास माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा.
आमदार
मनोहर भोईर -
अवयवदान मोहिमेसंदर्भात
मी एक गोष्ट सांगू इच्छितो की, ही मोहिम
लोकांपर्यंत अधिकाधिक पोहचण्यासाठी लोकप्रतिनिधींनी देखील अधिक योगदान दिले
पाहिजे. केवळ योगदान नव्हे तर प्रत्यक्ष
अवयवदानाचा फॉर्म भरुनच त्यात सक्रीय भाग नोंदवायला हवा.
जिल्हाधिकारी -शीतल तेली-उगले -
शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या या अवयवदान महा
अभियानात जिल्ह्यातील सर्वांनी मोठया
संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मी सर्वांनी करु इच्छिते. आपण केलेल्या अवयवदानाने
एकाद्याला जीवनदान मिळू शकते. नव आयुष्य मिळू शकते. यासारखा दुसरा आनंद तो काय? अवयवदान मोहिमेत
जिल्ह्यातील नागरिकांसोबतच अधिकाधिक कर्मचाऱ्यांनी देखील स्वयंस्फूर्तीने सहभाग
घ्यावा.
डॉ.मेघा
घाटे स्त्रीरोग तज्ञ
अवयवदान
जनजागृती अतिशय उपयुक्त असा उपक्रम शासन राबवत आहे. त्याबद्दल अभिनंदन. प्रत्येक नागरिकांने अवयवदान मोहिमेत सहभाग
घेऊन आपली अवयवदानाची इच्छा नोंदविली पाहिजे.
जीवंतपणी आपण समाजासाठी,लोकांसाठी, आप्तासाठी काही ना काही करतच असतो. मृत झाल्यावर देखील आपल्या शरीराच्या एकाद्या
अवयवाने आपण अन्य गरजूचे जीवन सुसह्य करु शकलो तर त्यासारखे भाग्य नाही. अगदी डोळयाचे उदाहरण घ्यायचे झाले तर
नेत्रदानाने आपण पुन्हा एकदा या जगतात राहून जग पाहू शकू. यानिमित्ताने मी एवढेच सांगू शकते की, अवयवदान
नक्कीच श्रेष्ठ दान आहे.
जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ.बी.एस.नागावकर-
अवयवदान महा अभियान एक
महत्वाचे अभियान आहे. संपूर्ण राज्यभर राबवल्या जाणाऱ्या या अवयवदानाच्या
विविध कार्यक्रमामध्ये सुसूत्रता राहण्यासाठी संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन
कार्यक्रमाचे नियोजन व सनियंत्रण करणार आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जिल्हा
शल्य चिकित्सक, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा आरोग्य अधिकारी
यांच्यावतीने देखील विविध उपक्रम
राबविण्यात येणार आहेत. यासाठी
शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाचा सहभाग आवश्यक असून एम.जी.एम.वैद्यकीय
महाविद्यालय, होमिओपाथिक मेडिकल कॉलेज अलिबाग,
लक्ष्मी धर्मादाय संस्था, पत्रकार, स्वयंसेवी सामाजिक संस्था यांचे सहकार्य
घेण्यात येणार आहे. अवयवदानाच्या या महा अभियानात वैद्यकीय विभागाला नागरिकांनी
सहकार्य करुन अवयवदानाचा महा संकल्प यशस्वी करण्यासाठी मदत करावी.
ॲड.प्रसाद
पाटील-
राज्य शासनाने अतिशय महत्वपूर्ण असे अवयवदान
अभियान राबविण्याचा जो निर्णय घेतला आहे तो निश्चितच लोकांसाठी उपयुक्त असा आहे.
कारण एखाद्याचे अवयवदान हे गरजूंना जीवनदान देणारे ठरू शकते. मरणोप्रांत आपण केलेले हे दान आहे. एखाद्यास जीवनदान मिळाल्याने ते महादान
ठरते. यातील कायदेशीर बाबींदेखील
महत्वाच्या आहेत. त्याचेही पालन होणे
आवश्यक आहे. मात्र अवयवदानाची ही चळवळ
अधिक जागृत होणे आवश्यक आहे. या अभियानात
सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मी करतो.
तेव्हा
मान्यवरांच्या या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्वांनी सहभाग घ्यावा.
00000
डॉ.राजू पाटोदकर
जिल्हा
माहिती अधिकारी
रायगड-अलिबाग


Comments
Post a Comment