जिल्हयातील बँकांनी आपली सेवा ग्राहकाभिमुख व सुटसुटीत करावी - जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
 दिनांक :- 20/09/2016                                                                                                           वृ.क्र.614
जिल्हयातील बँकांनी आपली सेवा
ग्राहकाभिमुख व सुटसुटीत करावी
                                  - जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले
अलिबाग दि.20 (जिमाका) अधिकाधिक लोकांना कर्ज उपलब्ध करुन देता यावे यासाठी बँकांनी कर्ज वितरण प्रणालीमध्ये सुटसुटीतपणा आणून आपली सेवा ग्राहकाभिमुख करावी अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय  बँकर्स कमिटीची आढावा बैठकीत  मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होत्या. या बैठकीस रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, भारतीय रिझर्व्ह बँकेचे जनरल मॅनेजर सी.पटनाईक, लीड बँकेचे प्रमुख टी.मधुसुधन, नाबार्डचे आर.एस.बुधकर तसेच जिल्हयातील बँकाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाल्या की, बँकांनी प्राथमिक वर्गात येणाऱ्या लोकांना अधिकाधिक कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. या घटकाला 100 टक्के कर्ज वितरीत करण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच शासनाच्या (सबसिडी) अनुदान असणाऱ्या योजना अंतर्गत अधिकाधिक कर्ज वितरीत करण्याकडे लक्ष केंद्रीत करावे.
स्वयंसहाय्यता गटांचे कर्जासाठींचे प्रस्ताव छोटया छोटया त्रुटीकाढून नाकारण्या एवेजी त्या पूर्ण करुन कर्जदाराला कशा प्रकारे कर्ज देता येईल यासाठी प्रयत्न करावेत तसेच योजनांची माहिती मिळवी व लोक कर्ज घेण्यासाठी पुढे यावेत यासाठी बँकांमार्फत जनजागृती कार्यक्रम वेळोवेळी आयोजित करावा असे ही त्यांनी सांगितले. तसेच प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, जीवन ज्योती बिमा योजना यासारख्या योजनेत अधिकाधिक नागरीकांचा सहभाग वाढेल यासाठी ही प्रयत्न करावेत. पंतप्रधान पिक विमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, निवृत्ती वेतन घेणाऱ्यांच्या बॅंक खात्याशी आधार कार्ड नंबर जोडणे आदि योजनांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. 
000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन