पंतप्रधान पीक विमा योजनेस मुदत वाढ शेतकऱ्यांना सहभागासाठी दि.5पर्यंत मुदत


अलिबाग दि. 2 (जिमाका)- जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना राबविली जात आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी  दि.31 जुलै ही मुदत देण्यात आली होती. तथापि शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता व अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी  केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कृषि विभागाने  दि. 1 ऑगस्ट रोजी शासन निर्णय निर्गमित करुन दि.5 ऑगस्ट, 2017 पर्यंत मुदत वाढविली आहे.  तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रायगड यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान