शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारित शासन निर्णयाचे प्रारुप अंतिम करण्यासाठी अभिप्राय पाठविण्याचे आवाहन
अलिबाग दि.10 (जिमाका):-एकविध
खेळाच्या राज्य संघटना यांचे प्रतिनिधी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील
खेळाडू, क्रीडा तज्ज्ञ क्रीडा प्रेमी मार्गदर्शक,
क्रीडा संघटक,कार्यकर्ते, साहसी क्रीडा प्रकाराचे खेळाडू व आयोजक,
पॅरालिपिक खेळाच्या राज्य संघटना व दिव्यांग खेळाडू, विविध शिवछत्रपती राज्य
क्रीडा पुरस्कारार्थी यांच्याकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारामध्ये अधिक
पारदर्शीपणा येण्यासाठी तसेच विविध खेळाच्या स्पर्धांचा समावेश करण्यासाठी खेळ
निहाय गुणांकन करण्यासाठी व सुधारित नियमावली तयार करण्यासाठी एकविध खेळाच्या
राज्य संघटनाचे प्रतिनिधी, क्रीडा प्रशिक्षक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू,
शिव छत्रपती पुरस्कारार्थी यांच्या सूचना, मत संचालनालयास मागविण्यात आलेले
होते. याबाबतच्या विविध बैठकाही संपन्न
झालेल्या आहेत. संचालनालयास प्राप्त
झालेल्या सुचनांचे संकलन करुन सुधारित शासन निर्णयाचे प्रारुप तयार करण्यात आलेले
आहे.
या
नियमावली संदर्भात राज्यातील क्रीडा क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, संघटना यांचे
अभिप्राय घेण्याकरिता सुधारित नियमावलीचा शासन निर्णयाचे प्रारुप शालेय शिक्षण व
क्रीडा विभागाच्या https://education.maharashtra.gov.in/ntsshare/admin/news update/1501845255 shivchhtrapati
new.pdf या संकेतस्थळावर दि. 13 ऑगस्ट 2017 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आले
आहे. नमूद केलेल्या संकेतस्थळाला भेट देऊन
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचा सुधारित शासन निर्णयामध्ये काही अजून अंतिम
सुधारणा करावयाच्या असल्यास आपले अभिप्राय dsysdesk14@gmail.com या
मेलवर 21 ऑगस्ट 2017 पर्यंत पाठवावेत.
तसेच हार्डकॉपी सुध्दा क्रीडा व
युवक सेवा संचालनालय, पुणे छत्रपती क्रीडा संकुल, महाळूंगे, बालेवाडी पुणे-45 या
पत्त्यावर पाठवावी. उशीरा प्राप्त
झालेल्या सुचनांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी असे जिल्हा क्रीडा
अधिकारी रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.
0000000
Comments
Post a Comment