क्रांतिसिंह नाना पाटील जयंतीनिमित्त प्रतिमापूजन

अलिबाग, दि.३(जिमाका)- थोर स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
            यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नन्दनवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे रामदास बघे, उपजिल्हाधिकारी रोहयो श्रीमती प्रेमलता जैतू, नाबार्डचे सुधाकर रगतवार, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रदीप नाईक,बँक ऑफ महाराष्ट्रचे पाटणकर, पंजाब नॅशनल बँकेचे नलावडे आदी अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.

Comments