'स्वच्छ पनवेल हरित पनवेल अभियान'ना.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रारंभ


अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.23:-  स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत स्वच्छ पनवेल हरित पनवेल अभियानाचा प्रारंभ राज्याचे न महूसल, मदत कार्य व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नवीन पनवेल येथील मल्हार महोत्सवात करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ.कविता चौतमल, उप महापौर चारुशीला घरत, अपर जिल्हाधिकारी भारत शितोळे, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना ना. पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले आहे.  या अभियनामध्ये समाजातील सर्व घटकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. स्वच्छता हा माझा आग्रहाचा विषय आहे. स्वच्छतेमुळे आपले आरोग्य, आपला परिसर चांगले राहते. पनवेल महानगरपालिका स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवित आहे. या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत.  यावेळी ना. पाटील यांच्या हस्ते 'स्वच्छ पनवेल हरित पनवेल' पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन