जमिन महसूल संहिता प्रारुप अधिसुचनेनुसार हरकती पाठविण्यासाठी 5 एप्रिल पर्यंत मुदत
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26- महाराष्ट्र जमिन महसूल संहिता,1966 च्या विविध कलमांच्या
प्रयोजनार्थ आकार, दंड, शास्ती,फी च्या रकमां विहीत करण्याकरिता प्रारुप नियमांची अधिसूचना शासन राजपत्राच्या असाधारण भाग चार-ब
मध्ये सोमवार दि.1 जानेवारी 2018 रोजी प्रसिद्ध झालेले आहे. या अधिसूचनेबाबत काही
सूचना, हरकती असल्यास त्या शासनाकडे सादर करण्यासाठी महसूल शाखा,(संकलन
अ-4),जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग येथे गुरुवार दि. 5 एप्रिल 2018 पर्यंत सादर
कराव्यात. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या सूचना,हरकती विचारात
घेतल्या जाणार नाहीत. असे जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांनी कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment