प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन: 30 एप्रिलला विशेष ग्रामसभेचे आयोजन
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23:- प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन रायगड जिल्ह्यात राबविण्यात
येणार आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची माहिती गावनिहाय संकलित केली जात
आहे. पात्र लाभार्थ्यांची संकलित याद्यांचे वाचन करण्यासाठी सोमवार दि.30 रोजी
विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी,
जिल्हा परिषद रायगड- अलिबाग यांनी दिली आहे.
या योजनेअंतर्गत ग्रामीण लाभार्थी पडताळणी
व अतिरिक्त माहिती संकलन मोहिम रविवार दि.15 एप्रिल पासून सुरु झाली असून ती
सोमवार दि.21 मे पर्यंत जिल्ह्यात
राबविण्यात येणार आहे. या योजनेत लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट् असलेल्या प्रत्येक
कुटूंबात प्रतिवर्षी रु. पाच लाख इतके आरोग्य विमा संरक्षण दिले जाणार आहे.
यासाठी सोमवार दि.30 एप्रिल रोजी
ग्रामसभेमध्ये लाभार्थी याद्यांचे वाचन करुन अतिरिक्त माहिती संकलन करण्यासाठी
लाभार्थ्यांची खालील बाबींवरील माहिती घेणे आवश्यक आहे.मोबाईल क्रमांक, शिधा
पत्रिका क्रमांक, कुटूंबाच्या सद्यस्थितीमधील बदल. तसेच या ग्रामसभेमध्ये उपस्थित
न राहणाऱ्या कुटूंबाची माहिती आशा, आरोग्य सेविकाद्वारे गृहभेटी देवून संकलित केली
जाणार आहे. तसेच माहिती संकलित करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला ग्रामसेवक,आरोग्य
कर्मचारी, आरोग्य सेविका,अशी पथके तयार करण्यात आली आहेत. संकलित केलेली माहिती 7
मे नंतर वेबसाईटवर अपलोड केली जाणार आहे.
तरी सर्व नागरिकांनी दि.30 एप्रिल रोज ग्रामसभेला उपस्थित राहून माहिती संकलनास
सहकार्य करावे. जेणेकरुन अधिकाधिक कुटूंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य
सुरक्षा मिशन या योजनेचा लाभ घेता येईल,
असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांनी केले आहे.
Comments
Post a Comment