जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 123.90 मि.मि.पावसाची नोंद



अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.10-  रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 123.90 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 1623.72 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 104.00 मि.मि., पेण-80.00 मि.मि., मुरुड-76.00 मि.मि., पनवेल-180.20 मि.मि., उरण-188.00 मि.मि., कर्जत-141.40 मि.मि., खालापूर-118.00 मि.मि., माणगांव-183.00 मि.मि., रोहा-195.00 मि.मि., सुधागड-87.00 मि.मि., तळा-145.00 मि.मि., महाड-186.00 मि.मि., पोलादपूर-81.00 म्हसळा-61.80 मि.मि., श्रीवर्धन-12.00 मि.मि., माथेरान-144.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1982.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 123.90 मि.मि.  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 51.67  टक्के इतकी आहे.
अतिवृष्टीचा इशारा
भारतीय हवामान विभाग यांच्या वेधशाळेकडून  जारी करण्यात आलेल्या हवामान अंदाजानुसार, येत्या 14 तारखेपर्यंत जिल्ह्यात मध्यम ते अतिवृष्टिचा इशारा देण्यात आला आहे. तसेच येत्या 24 तासातही अतिवृष्टीची स्थिती कायम राहणार असून या काळात समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे. वारे ताशी 50 ते 60 किमी वेगाने वाहणार असून  मच्छिमारांनी येते पाच दिवस समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन