विकासकामांबाबत नियोजन करा- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.10-  विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करावयाच्या विकास कामांसाठी तांत्रिक मान्यता प्राप्त करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले.
 जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या कामांचा आढावा आज जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी घेतला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्ह आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई,  तसेच विविध शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्याचा सन 2018-19 यावर्षीचा 189 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर आहे. सर्व विभागांनी या आर्थिक वर्षात राबवावयाच्या योजनांचे प्रस्ताव आपल्या विभागाकडे पाठवून त्वरीत तांत्रिक मान्यता घ्याव्यात व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे सादर कराव्यात. जेणेकरुन लवकर प्रशासकीय मान्यतेची कारवाई करता येईल. आता कामे करुन घेण्यासाठी कमी कालावधी शिल्लक राहिला असून अधिकाऱ्यांनी वेळेचे नियोजन करुन कामे करावीत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन