नवोदय विद्यालय इयत्ता 6 वी प्रवेश; निवड चाचणी 6 एप्रिल रोजी:ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 पर्यंत
अलिबाग,
जि. रायगड, दि.12 (जिमाका)- भारत सरकारच्या मानव संसाधन विकास
मंत्रालयाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वीत प्रवेश
घेण्यासाठी प्रत्येक जिल्हा पातळीवर संपुर्ण देशात निवड चाचणी घेतली जाते. यंदा ही
चाचणी परीक्षा 6 एप्रिल 2019 रोजी प्रत्येक तालुक्याच्या केंद्रावर घेण्यात येणार
आहे. या चाचणीचे माहितीपत्रक व प्रवेश अर्ज www.navodaya.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. रायगड जिल्ह्यातील जे विद्यार्थी इयत्ता 5 वी च्या
वर्गात शासनमान्य शाळेत शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा,
आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत भरावेत. अधिक माहितीसाठी
जवाहन नवोदय विद्यालय, निजामपूर चे प्राचार्य पी.के. नारायणन यांना भेटावे अथवा
02140-268386 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment