नवोदय विद्यालय इयत्ता 9 वी प्रवेश; निवड चाचणी 2 फेब्रुवारी रोजी: ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 पर्यंत
अलिबाग,
जि. रायगड, दि.12 (जिमाका)- जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 9 वी
प्रवेशासाठी घेण्यात येणारी निवड चाचणी परीक्षा 2 फेब्रुवारी 2019 रोजी होणार
आहे. त्यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांनी
ऑनलाईन अर्ज भरुन देण्याची अंतिम मुदर दि.30 नोव्हेंबर 2018 पर्यंत आहे. ऑनलाईन
अर्ज www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी
या निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य पी.के. नारायणन यांनी केले
आहे.
Comments
Post a Comment