शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज मागविले
अलिबाग, जि. रायगड, दि.13 (जिमाका)- महाराष्ट्र
शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रतीवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
प्रदान करण्यात येतात. त्यात राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, साहसी उपक्रम, दिव्यांग
खेळाडूंसह, संघटक / कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व
संघटक / कार्यकर्ती यांचेसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार तसेच जेष्ठ क्रीडा
महर्षीकरीता शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील खेळाडू, संघटकांकडून
अर्ज मागविण्यात आले आहेत.
सन 2017-18 या वर्षासाठीच्या संघटक /
कार्यकर्ते या पुरस्कारासाठीच्या संबंधित अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत ही दि. 25 नोव्हेंबर
पर्यंत आहे. तर आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते पुरुष व महिला
खेळाडू, साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडूंसह, क्रीडा मार्गदर्शक यांचेसाठी ऑनलाईन
अर्ज सादर करण्याची मुदत दि. 5 डिसेंबर पर्यंत आहे. संबंधितांनी ऑनलाईन पध्दतीने आपल्या
कामगिरीच्या तपशीलासह विहीत नमुन्यातील अर्ज www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या link वर अर्ज सादर करावा. तर ऑनलाईन
भरलेल्या अर्जाची एक प्रत स्वयंसाक्षाकित प्रमाणपत्रांसह अर्जदाराने संबंधित
जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड यांच्या कार्यालयात सादर करावे.
संघटक / कार्यकर्ते यांनी दि.25 नोव्हेंबर
पुर्वी व उर्वरीत पुरस्काराच्या अर्जदारांनी दि.05 डिसेंबर पुर्वी अर्ज सादर
करावी. ऑनलाईन अर्जासोबत अपलेाड करण्यात आलेल्या कागदपत्रांशिवाय इतर कोणतेही
अधिकचे कागदपत्रे अर्जासोबत जोडण्यात येवू नये . जर ऑनलाईन व्यतिरिक्त इतर
कागदपत्रे जोडलेली असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कागदपत्रांचा गुणांकनासाठी
विचार केला जाणार नाही याची कृपया अर्जदारांनी नोंद घ्यावी. याबाबत अधिक माहिती ,
पात्रतेचे निकष व नियमावली इ. माहितीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर शासन निर्णय
दि.16 ऑक्टोबर 2017, शासन शुध्दीपत्रक दि.08/12/2017 व शासन शुध्दीपत्रक
दि.24/10/2018 चे अवलोकन करावे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर
www.maharashtra.gov.in व www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
अंतर्गत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
(संघटक / कार्यकर्ते), जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला संघटक / कार्यकर्ते
व महिला क्रीडा मार्गदर्शक), राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, शिवछत्रपती राज्य
क्रीडा पुरस्कार (खेळाडू), एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार(दिव्यांग खेळाडू),
शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार आहेत.
जेष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक / कार्यकर्ते व क्रीडा
क्षेत्राशी संबंधित अशा 60 वर्षावरील व्यक्तींनी क्रीडा व खेळासाठी आपले सर्वस्व
पणाला लावून आपले जीवन क्रीडा विकासासाठी व्यतीत केले आहे अशा जेष्ठ क्रीडा
महर्षीचा गौरव करण्याचा दृष्टीने शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार
प्रदान करण्यात येतो. या करीता अर्ज मागविण्यात येत नसून अशा जेष्ठ क्रीडा
महर्षीची माहिती ही जिल्हा क्रीडा अधिकारी, विभागीय उपसंचालक हे संचालनालयास सादर
करतील.
अधिक माहितीसाठी क्रीडा व युवक सेवा
संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे , संबंधित विभागाचे विभागीय उपसंचालक, क्रीडा व
युवक सेवा, अथवा संबंधित जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड यांच्या
कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकरी महादेव कसगावडे यांनी केले
आहे.
00000
Comments
Post a Comment