राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम आज (दि.27)
अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.26:- येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व
सभागृहात गुरुवार दि. 27 रोजी राष्ट्रीय
ग्राहक दिन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्राहक
तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष विजय शेवाळे हे राह्णार असून जिल्हाधिकारी डॉ. विजय
सूर्यवंशी यांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार आहे. सदर कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
राजस्व सभागृहात दुपारी साडेबारा वाजता आयोजित करण्यात आला असून उपस्थितीचे आवाहन जिल्हा
पुरवठा अधिकारी लिलाधर दुफारे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment