ग्रंथोत्सवाची यशस्वी सांगताःग्रंथ वाचनाची प्रेरणा घ्यावी- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16- ग्रंथ वाचन ही एक चांगली सवय
असून ती आपण विद्यार्थी दशेपासूनच
अंगिकारावयास हवी. ग्रंथवाचनाने आपले विचार व्यक्त करण्याची सवय आपल्याला जडते.
त्यामुळे आपले वक्तृत्व सुधारते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.
दोन
दिवस चाललेल्या रायगड जिल्हा ग्रंथोत्सवाची आज यशस्वी सांगता झाली. या समारोप
सोहळ्याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थितांना मार्गदर्शन करीत
होते. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले,डॉ. आरती
सूर्यवंशी, अमृत देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने हे उपस्थित होते.
यावेळी वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
दोन दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सव
सोहळ्यात लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनात वाचकांनी मोठ्या संख्येने भेट दिली.
गेले दोन दिवस या सोहळ्यात विविध विषयांवर मान्यवर अभ्यासू वक्त्यांचे मार्गदर्शन
वाचकांना व पुस्तकप्रेमींना ऐकता आले. या शिवाय महाराष्ट्राचे थोर गीतकार ग. दि.
माडगुळकर व साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रम, कविसंमेलन या
कार्यक्रमांनी रंगत आणली.
या आयोजनासाठी जिल्हा ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी तसेच
सदस्य जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, जिल्हा उपशिक्षण अधिकारी, (माध्य)
एस.यु.पवार जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष नागेश कुळकर्णी कोकण मराठी साहित्य परिषद रायगड
जिल्हा अध्यक्ष संजय गुंजाळ, अलिबाग तालुकाध्यक्ष पूजा वैशंपायन तसेच सदस्य सचिव जिल्हा
ग्रंथालय अधिकारी धरमसिंग बा. वळवी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे तांत्रिक सहायक अजित पवार, कनिष्ठ लिपिक श्रीमती ममता रोगे, जिल्हा ग्रंथालय संघ, रायगडचे
प्रमुख कार्यवाह संजय भायदे, जिल्हा वाचनालय, डोंगरे हॉलचे ग्रंथपाल भालचंद्र भाऊ वर्तक व सर्व कर्मचारी वृंद सार्वजनिक वाचनालय, डोंगरे हॉल, अलिबाग यांनी
परिश्रम घेतले.

Comments
Post a Comment