‘मला भावलेले गांधीजी’ मधून विद्यार्थ्यांनी सांगितली राष्ट्रपित्याची थोरवी; वक्तृत्व स्पर्धेत जहीर हसन कुरेशी प्रथम तर भाग्यदा जोशी द्वितीय


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16- रायगड जिल्हा ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘ग्रंथवाचनातून मला भावलेले गांधीजी’ या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींची थोरवी सांगितली. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी यांच्या जीवनावरील ग्रंथ वाचनाचा प्रत्यय उपस्थितांना आला.
रायगड जिल्हा ग्रंथोत्सव 2018 च्या दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात ही स्पर्धा झाली. शालेय  विद्यार्थ्यांमध्ये  वाचनाचे संस्कार रुजावेत म्हणून  राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या 150 व्या जयंतीचे निमित्त साधून  इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथवाचनातून मला भावेलेले गांधीजी’  या गांधीजींच्या जीवनावरील ग्रंथ वाचन व त्या अनुष्ंगाने  वक्तृत्व स्पर्धा  शिक्षण विभागाच्या  वतीने जिल्ह्यतील सर्व शाळांमध्ये आयोजित  करण्यात आली होती.  त्यातून प्रत्येक तालुका स्तरावर एक  विद्यार्थी  निवडण्यात आला. या  विद्यार्थ्यांची  जिल्हास्तरीय वत्कृत्व स्पर्धा आज ग्रंथोत्सवात पार पडली. या स्पर्धेत 15 विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.  स्पर्धा अनंत देवघरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक महात्मा गांधी विद्यालय हशिवरे ता. अलिबाग येथील जहीरहसन आयमुद्दिन कुरेशी याने, द्वितीय क्रमांक त्याच विद्यालयाची भाग्यदा सुभाष जोशी हिने तर वडके हायस्कूल चौंडी येथील प्रतिक्षा अशोक कागे हिने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच धनुर्धर शंकर खोपकर माध्यमिक शाळा परहूर ता. अलिबाग येथील शर्वरी सुधीर कवळे, श्रीमती जाऱ. ह. कन्या शाळा अलिबाग येथील स्वरश्री रविंद्र थळे, जाऱ. ह. कन्या शाळा अलिबागची निधी विशाल गावंड यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना समारोप समारंभात जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विनोद टेंबुलकर व भावेश्री उमेश वाळंज यांनी काम पाहिले.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन