पनवेल येथे शुक्रवारी रोजगार मेळावा
अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.26:- पनवेल महानगर पालिका व कौशल्य विकास, रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पनवेल यांच्या सयुक्त विद्यमाने पनवेल महानगरपालिकेचे
आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, शिवाजी पुतळ्याजवळ, ओल्ड पनवेल येथे
शुक्रवार दि. 28 रोजी सकाळी 10वा. बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळावा आयोजित
करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध
कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांच्या
प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार आहेत.
सदर कंपन्यांना दहावी व बारावी, पदवी, पदवीधर (सदर रोजगार मेळाव्याच्या
दिवशी उपस्थित उद्योजकांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार) अशा उमेदवारांची आवश्यकता
आहे.
या मेळाव्यात सहभाग घेऊन इच्छिणाऱ्या उमदेवारांनी या
विभागाच्या https://rojar.mahaswayam.gov.in
या वेबपोर्टलला भेट देऊन नोंदणी व अद्ययावतीकरण करणे आवश्यक आहे. तसेच यापूर्वी महारोजगार वेबपोर्टलवर नोंदणी
केली असल्यास सुधारित संकेतस्थळावर आपला
जुना 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगिन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी
करावी. तसेच जॉब फेअर टॅबवर क्लिक करुन
NULM job Fair panvel यामध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे ॲप्लाय करावे. यामध्ये काही अडचण आल्यास किंवा सहाय्यासाठी
हेल्पलाईन 18602330133 किंवा संकेतस्थळ मुखपृष्ठावरील उजव्या खालील बाजूस उपलब्ध
असलेल्या Rojgar Chat Helpline या सुविधेचा उपयोग करावा.
राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान व प्रमोद महाजन
कौशल्य विकास अभियानाअंतर्गत प्रशिक्षित लाभार्थी, उमेदवार तसेच इच्छुक बेरोजगार
उमेदवारांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभा घ्यावा तसेच मुलाखतीस येताना स्वत:चा
बायोडाटा, दोन फोटो,सर्व शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व त्याच्या छायांकित प्रतिसह
वरील ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड यांनी केले आहे.
Comments
Post a Comment