प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रम;शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26:- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2018-19
अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांना विविध विषयांबाबत प्रक्षेत्र
प्रशिक्षण द्यावयाचे आहे. कृषि विभागाच्या
विविध योजनांमध्ये लाभ घेतलेल्या तसेच लाभ घेऊ इच्छित शेतकऱ्यांकडून राज्यांतर्गत
प्रक्षेत्र प्रशिक्षण या कार्यक्रमाकरिता दि.31 डिसेंबर पर्यंत अर्ज मागविण्यात
आले आहेत. शेतकऱ्यांनी आपले प्रशिक्षण
विषयावरील अर्ज हे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन करण्यात
आले आहे.
प्रशिक्षणाचे विषय: फळबाग लागवड, आंबा घन लागवड, फळबाग व्यवस्थापन-बहार व्यवस्थापन, फळपिकनिहाय
अधिक उत्पादनक्षम जातीची ओळख, उपलब्धता, काटेकोर शेती व्यवस्थापन, कांदाचाळ,
संरक्षित शेती, एकात्मिक किड रोग, अन्नद्रव्य व्यवस्थापन, काढणी पश्चात
व्यवस्थापन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र-काजू प्रक्रिया, बेदाणा प्रक्रिया,
सिताफळ,आवळा,डाळिंब प्रक्रिया इत्यादी शितसाखळी, रायपनिंग चेंबर असे आहेत. या प्रशिक्षण
कार्यक्रमाकरिता प्रशिक्षणार्थींची नाश्ता, भोजन व निवास व्यवस्था पाच दिवसाच्या
प्रशिक्षणाच्या कालावधीत कृषी विभागामार्फत केली जाईल. तसेच प्रशिक्षण सातारा
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष क्षेत्र व नामांकित संस्थामध्ये देण्यात येणार
असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन पांडूरंग शेळके जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी रायगड-अलिबाग यांनी केले आहे.

Comments
Post a Comment