'आयपास' प्रणालीमुळे निधीचे व्यवस्थित नियोजन होण्यास मदत -जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी



अलिबाग, दि. 17 (जि.मा.का.) : 'आयपास' या प्रणालीमुळे जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्चाबाबत नागरिकांना माहिती मिळणार आहे. त्यामुळे पारदर्शीपणा राहणार आहे. हे तत्व लक्षात घेतल्यास निधीचे व्यवस्थित नियोजन होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.
         जिल्हा नियोजन कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथील सभागृहात 'आयपास' इंटिग्रेटेड प्लॅनिंग ऑफिस ॲटोमेशन सिस्टिम बाबत आज प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा नियोजन अधिकरी सुनिल जाधव, आदी उपस्थित होते.
            जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करून आयपास या प्रणालीविषयी सविस्तर माहिती दिली. जिल्हा नियोजन समितीचा निधी जिल्ह्यातील विविध विभागांमार्फत व्यवस्थित खर्च होतोय की नाही यासाठी प्रधान सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी ही प्रणाली राज्यामध्ये आणली. राज्यामध्ये विविध 140 योजना आहेत. या प्रणालीमुळे कामामध्ये गती येईल.
            जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, या प्रणालीमध्ये भविष्यात सुधारणा होत जातील, पण पायाभूत संकल्पना सर्वांनी समजून घ्यावी. या प्रणालीमुळे कागदांचे काम कमी होवून गतिमानता येणार आहे. निधी परत करणे किंवा परत जाणं या सारख्या गोष्टी सध्या घडत असतात. या प्रणालीमध्ये माहिती भरल्यानंतर ती नागरिकांनाही समजणार आहे. त्यामुळे निधीचे व्यवस्थित नियोजन होण्यास निश्चित मदत होईल.
            यावेळी कुणाल लोंढे व तेजस यांनी या प्रणालीविषयी उपस्थितांना प्रशिक्षण दिले. जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख आणि कर्मचारी प्रशिक्षणासाठी उपस्थित होते.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन