मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुन:परीक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदार पडताळणी कार्यक्रम
अलिबाग
दि.17, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार
1 जानेवारी 2020 या अर्हता आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुन:रीक्षण कार्यक्रम
जाहीर करण्यात आला आहे. हा कार्यक्रम 11 नोव्हेंबर, 2019 ते 2 मार्च 2020 पर्यंत राबविला जाणार असून बिनचूक छायाचित्र मतदार यादी
तयार करण्यासाठी सर्व नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी
यांनी केले आहे. सदरचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
पुन:रीक्षण कार्यक्रमाचे टप्पे :- मतदार पडताळणी कार्यक्रम
(EVP) मोहिम स्वरुपात SVEEP च्या मदतीने आणि मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण
सारख्या इतर पुर्व-पुन:रीक्षण कार्यक्रम कालावधी शुक्रवार दि. 20 डिसेंबर, 2019 पर्यंत.
पुन:रीक्षण कार्यक्रम एकत्रित प्रारुप मतदार याद्यांची
प्रसिध्दी सोमवार दि.30 डिसेंबर, 2019, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी सोमवार
दि.30 डिसेंबर, 2019 ते गुरुवार दि.30 जानेवारी 2020, विशेष मोहिमांचा कालावधी शनिवार
दि.4 जानेवारी, 2020 आणि रविवार दि.5 जानेवारी 2020, शनिवार दि.11 जानेवारी 2020 आणि
रविवार दि.12 जानेवारी 2020. दावे व हरकती निकालात काढणे सोमवार दि.10 फेब्रुवारी
2020 पूर्वी. प्रारुप मतदार यादीच्या मापदंडाची तपासणी करणे आणि मतदार यादीच्या अंतिम
प्रसिध्दी करीता आयोगाची परवानगी घेणे गुरुवार दि.20 फेब्रुवारी, 2020 पूर्वी. डाटाबेसचे
अद्यावतीकरण आणि पुरवणी याद्यांची छपाई इत्यादी बुधवार दि.26 फेब्रुवारी, 2020 पूर्वी.
मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी सोमवार दि.2 मार्च, 2020.
रायगड जिल्ह्यातील एकूण मतदार 22 लाख 72 हजार 37, एकूण
मतदान केंद्र 2693. मतदार याद्यांचे पुन:रीक्षण प्रत्यक्षात सुरु करण्यापूर्वी मतदार
पडताळणी कार्यक्रम (EVP) राबवण्यांत येत आहे. यामध्ये मतदारांकडून स्वयंस्फूर्तीने
प्राप्त माहिती आणि मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याद्वारे प्रत्यक्ष पडताळणीच्या
आधारे मतदाराच्या खालीलप्रमाणे तपशिलाचे पडताळणी प्रमाणीकरण करण्यांत येणार आहे.
मतदाराचा तपशीलीची पडताळणी, दुरुस्ती, छायाचित्र देखील
समाविष्ट नोंदणी प्रमाणिकरण, कुटुंबाचा तपशील प्राप्त करुन त्याच्या नोंदीची पडताळणी,
मतदाराचा संपर्क तपशील प्राप्त करुन घेणे, विद्यमान संभाव्य मतदार केंद्राचा तपशील
प्राप्त करुन घेणे, मतदार यादी अद्यावत व शुद्ध करणे, निवडणूक विषयक सेवांमध्ये सुधारणा
करणे, कायमस्वरुपी स्थलांतरीत किंवा मयत झालेल्या सदस्यांचा तपशिल गोळा करणे, पात्र
असलेल्या परंतू यादीमध्ये नोंदणी न झालेल्या (दि.01.01.2001 रोजी किंवा त्यापूर्वी
जन्मलेला) तसेच दि.02.01.2002 ते दि.01.01.2003 या कालावधीमध्ये जन्मलेल्या कुटुंब
सदस्याचा तपशिल गोळा करणे.
मतदारांना त्यांच्या तपशिलाची पडताळणी खालील साधनांद्वारे
करता येईल
व्होटर हेल्पलाईन मोबाईल ॲप, राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल
(NVSP), सामायिक सेवा केंद्र (CSCs) यास भेट देऊन. मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयाशी
सलग्न मतदार सुविधा केंदा्रस भेट देऊन, दिव्यांग मतदार Voter helpline (1950) शी संपर्क
करुन.
मतदारांनी नोंदीचे प्रमाणिकरण करण्यासाठी खालील पैकी कोणत्याही
एका कागदपत्राची प्रत जमा/अपलोड करण्याची आहे.
भारतीय पारपत्र, वाहनचालक परवाना, आधार कार्ड, शिधापत्रिका,
सरकारी/निमसरकारी कार्यालयाचे ओळखपत्र, बँकेचे पासबुक, किसान ओळखपत्र, पॅनकार्ड, राष्ट्रीय
लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) द्वारा जारी केलेले
स्मार्ट कार्ड, अर्जदाराच्या नावे किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईकांच्या नावे असलेले
अलीकडचे पाणी/दूरध्वनी/वीज/गॅस कनेक्शन बील ज्यामध्ये निवास पत्ता नमूद असेल.
जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदार यादीतील स्वत:चा तसेच
त्यांच्या नातेवाईक यांचा तपशिल, मतदान केंद्र इ. ची पडताळणी करुन घ्यावी जेणे करुन
मतदारांना कोणत्याही चुकीच्या नोंदीमुळे भविष्यात अडचण निर्माण होऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी
तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment