पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण



अलिबाग दि.07, रायगड जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींची पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास वर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण महिलांसाठी सोडत पध्दतीने आरक्षित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग येथील राजस्व सभागृत येथे दि.10 डिसेंबर, 2019 रोजी सकाळी 11 वाजता सभा आयोजित केली आहे. तरी जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य स्तरावरील सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रत्येकी एक प्रतिनिधीस पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षणाच्या सभेस उपस्थित राहता येईल असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान