पत्र सूचना कार्यालयाच्यावतीने पेण जि.रायगड येथे वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन



नवी मुंबई, दि.17 :- पत्र सूचना कार्यालय, मुंबईच्यावतीने पेण जि.रायगड येथे पत्रकारांसाठी वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन दि.26 डिसेंबर 2019 रोजी करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या विविध विकासात्मक योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच पत्र सूचना कार्यालय आणि प्रसार माध्यमांचा परस्पर संवाद वाढावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वार्तालाप कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ पत्रकार विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधतील. पत्र सूचना कार्यालयाच्या सहाय्यक संचालक भावना गोखले या विभागाच्या कार्याबद्दल उपस्थितांना विस्तृत माहिती देतील.
या कार्यशाळेचे उद्घाटन रायगड जिल्हयाचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते सकाळी 10.00 वा. हॉटेल सौभाग्यवन इंटरनॅशनल, आंबेघर गणपतीवाडी, पेण खोपोली रोड पेण जि.रायगड येथे करण्यात येईल. या कार्यशाळेत श्री. प्रसाद केरकर कृषिवल समूह संपादक, श्री. सुधीर गव्हाणे कुलगुरु एम.जी.एम.औरंगाबाद, श्रीमती राही भिडे लोकमत मुंबई, श्रीमती मृणाल नानीवडेकर तरुण भारत, ओमकार दाभाडकर आणि डॉ.गणेश मुळे उपसंचालक (माहिती) माहिती व जनंसपर्क, कोकण विभाग हे उपस्थित पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधतील. या कार्यशाळेसाठी विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई येथे नोंदणी करून उपस्थित राहण्याचे आवाहन रायगड जिल्हयातील पत्रकारांना डॉ.गणेश मुळे उपसंचालक (माहिती) विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई, श्रीमती भावना गोखले सहाय्यक संचालक पत्र सूचना कार्यालय, मुंबई यांनी केले आहे.
-------------------


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन