महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान मुठवली तर्फे तळे विकास कामांचे लोकार्पण सोहळा व भूमिपूजन.



       अलिबाग दि.17,  महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान मुठवली येथे विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम संपन झाला. सदर कामे जिल्हा परिषद फंड , पंचायत समिती फंड,  कृषी विभाग फंड, ग्राम सामाजिक परिवर्तन फंड , ग्राम पंचायत फंड आणि स्वदेस फाऊंडेशन फंड असे एकूण 3 कोटी 90 हजार रुपये मधून झालेल्या कामांचे लोकार्पण सोहळा काल 16/12/19 रोजी   संपन्न झाला. तसेच सन 2019-2020 चा आराखडा मधील  कामांचे उद्घाटण करण्यात आले.
         सदरची विकास कामे निवी, निवि आदिवासी वाडी, नीवी बौद्ध वाडी मुठवळी, उमरोली दिवाळी, उमरोळी बौद्ध वाडी आणि उमरोली आदिवासी वाडी येथे घेण्यात आली. यावेळी  जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, तहसीलदार  प्रियांका आयरे,  रसिका  बलगे मिशन असोशिएट ग्रा.सा. प.अभियान, पवार साहेब स्वदेस फाऊंडेशन, सरपंच शर्मिला बडेकर, उपसरपंच  मिलिंद दळवी, ग्रामसेवक अश्विनी शेलार, ग्राम पंचायत सदस्य सौ पूनम गलांडे व सौ. बाबारे (पोलिस पाटील),  ग्राम परिवर्तक लहू डोलतडे ,  बुध्दघोष पवार समस्थ ग्रामस्थ ग्रुप उपस्थित होते.
     या कामांमध्ये पाणी पुरवठा योजना, पाणी शुध्दीकरण , व्यायामशाळा, अंतर्गत काँक्रिटीकरण रस्ते,  प्राथमिक शाळा डिजिटल करणे, शाळांतील नवीन शौचालय, ग्रंथालय, घर तिथे  शोषखड्डा , सोलर वर पाणीपुरवठा योजना, गणपती विसर्जन घाट अशी विविध अनेक प्रकारची कामे केली होती. त्याचा लोकार्पण सोहळा करण्यात आला.
000000



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन