“कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका.. काळजी घ्या ! 1 ते 24 मार्च दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांची माहिती जाहीर





अलिबाग,दि.25(जिमाका)-  जे नागरीक  दि.1 ते 23 मार्च दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतले आहेत, त्या प्रवाशांबद्दलचा तपशिल जिल्हा प्रशासनाने कळविला आहे. तो पुढीलप्रमाणे-
एकूण परदेश प्रवासावरुन परतलेले नागरीक-1065, परदेशी प्रवास करुन परतल्यानंतर 14 दिवसांचा incubation कालावधी पूर्ण केलेले वा पुन्हा परदेशी परतलेले नागरीक-250, घरामध्ये अलगीकरणात (Home Qurantine) असलेले नागरीक-717, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये (Institutional Qurantine) असलेले नागरीक-96.
मुंबई येथील भाभा हॉस्पिटल मध्ये दाखल नागरीक-01 असून या नागरिकाच्या तब्येतीची स्थिती उत्तम आहे तर कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे विलगीकरण कक्षात दाखल नागरीक-1 असून या नागरिकाच्या तब्येतीची स्थिती उत्तम आहे.
परदेशी प्रवास करुन परतलेल्या नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-
 जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या-26, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या-8, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे SWAB तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या-18, तपासणीअंती ‘-’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या-16, तपासणी अंती ‘+’ ve  रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या-02, ‘+’ ve रिपोर्ट असेलेले उपचारानंतर ‘-’ve रिपोर्ट आलेले नागरीक-1 तर सद्य:स्थितीत +ve रिपोर्ट असलेल्या नागरिकांची संख्या-1 अशी माहिती जिल्हा प्रशासनाने कळविली आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन