अन्न व औषध प्रशासन (महाराष्ट्र राज्य) विभागाचा नियंत्रण कक्ष स्थापन
अलिबाग,दि.25(जिमाका)- सध्या जगात/देशात/राज्यात करोना
विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झालेली आहे. या
परिस्थितीत जनतेला सर्व आवश्यक औषधे नियमित उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. औषध
वितरण व उत्पादन हे अत्यावश्यक सेवेमध्ये मोडते. मात्र औषध वितरण नियमित ठेवणे व
औषध उत्पादन सुरळीत सुरु ठेवणे यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.
या
अडचणींचे तत्परतेने निराकरण करण्याच्या दृष्टीकोनातून अन्न व औषध प्रशासनाच्या
मुख्यालयात श्री. सुनील भारद्वाज, पोलीस अधीक्षक तथा सह आयुक्त (दक्षता), अन्न व
औषध प्रशासन यांच्या नियंत्रणात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
तरी संबंधितांना काही अडचणी आल्यास त्यांनी नियंत्रण
कक्षाशी संपर्क साधावा, यासाठी नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. १८००२२२३६५(टोल फ्री)
व ०२२-२६५९२३६२/६३ हे आहेत.
000000
Comments
Post a Comment