जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा व नाशवंत मालाच्या वाहतुकी व्यतिरिक्त अन्य वाहतुकीसाठी जिल्ह्याच्या सीमा बंद -जिल्हाधिकारी निधी चौधरी
अलिबाग,दि.25(जिमाका)- करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि
त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2
अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005
च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत
लॉकडाऊन लागू विविध नियम व उपाययोजना करण्यात येत आहेत.
या अधिसूचनेद्वारे सर्व आंतरराज्यीय बस आणि प्रवासी
वाहतूक सेवा (खाजगी वाहनांसह) त्यामध्ये खाजगी चालकांकडून केली जाणारी वाहतूक सेवा
निलंबित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी दिले आहेत.
त्यानुसार महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020
मधील नियम 10 नुसार प्राप्त अधिकारातून करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी
दि.24 मार्च 2020 रोजी रात्री 9.00 पासून पुढील आदेश होईपर्यंत रायगड जिल्ह्यात वाहतुक बंदी लागू करण्याचे आदेश जारी करण्यात आले
आहेत.
रायगड जिल्हयाच्या संलग्न ठाणे, पुणे, रत्नागिरी,
सिंधुदूर्ग व सातारा या जिल्ह्याच्या सीमा जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा व
नाशवंत मालाच्या वाहतुकीव्यतिरिक्त अन्य वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहेत.
पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई, पोलीस अधिक्षक,
रायगड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण यांनी
संयुक्तरित्या रायगड जिल्हयातील सर्व सीमावर्ती ठिकाणी नाकेबंदी करुन वाहनांची
तपासणी करुन त्यांना प्रवेश व निर्गमन करण्यास प्रतिबंध करावा, रायगड जिल्ह्यात
आंतरजिल्हा बस आणि प्रवासी वाहतूक सेवा (खाजगी वाहनांसह) त्यामध्ये खाजगी
चालकांकडून केली जाणारी वाहतूक सेवा, जलवाहतूक इ. वाहतूकीसही हे बंदी आदेश लागू
राहतील.
मात्र हे आदेश पुढील बाबीसंदर्भातील वाहतूकीस लागू राहणार नाहीत. १. शासकीय
/ निमशासकीय कार्यालये, सहकारी महामंडळाचे उपक्रम/आस्थापना, बँका व रुग्णालये. २.
अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रुग्णालये,पॅथोलॉजी, लॅबोरेटरी, दवाखाने. ३. सर्व
प्रकारचे वैद्यकिय कॉलेज (ऍलोपथी, आयुर्वेदीक,होमियोपथी इत्यादी) व नर्सिंग कॉलेज.
४.पेट्रोल पंप, एलपीजी. गॅस एजन्सी. ५. अंत्यविधी ६. अत्यावश्यक किराणा सामान,
दूध/दुग्धोत्पादने, फळे व भाजीपाला, औषधालय (Chemist) व त्यांचे होलसेलर,
ड्रिस्टीब्युटर, जीवनावश्यक वस्तू विक्री / वितरीत करण्यास, घरपोच सेवा पुरविण्यास
परवानगी राहील. ७. सर्व हॉटेल/लॉज यांना तेथे वास्तव्यास असणाऱ्या ग्राहकांना आरोग्य
विषयक आवश्यक ती खबरदारी घेवून रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ बनवून देण्यास परवानगी
राहील. ८. मटन/चिकण/मासे विक्री दुकान इत्यादी. ९. ज्या आस्थापना (उदा. माहिती व
तंत्रद्यान उद्योग, Major Port, Import-Export करणारे उद्योग, Petrochemical उद्योग इ.) ज्यांच्याकडे देश व परदेशातील
अतिमहत्वाच्या (Critical-National & International Infrastructure) उपक्रमांची
जबाबदारी आहे व या आस्थापना बंद राहिल्याने अशा उपक्रमांच्या प्रक्रियेला बाधा येऊ
शकते, ज्या कंपन्यांची उत्पादन प्रक्रिया अखंडित चालू राहणे (Continuous Processing
Industry) अनिवार्य आहे, अशा सर्व कंपन्या, मॅन्युफॅक्चरींग अँण्ड प्रॉडक्शन
कंपनी, खाद्य,मेडिकल उपकरण, औषधे इ. चे उद्योग तसेच त्यांना कच्च्या मालाचा (Raw
Material) पुरवठा करणाऱ्या, त्यांची उपउत्पादने करणाऱ्या कंपन्या व त्यांच्या
पॅकेजिंग करणाऱ्या सर्व कंपन्या १०. प्रसारमाध्यमांचे (सर्व प्रकारचे दैनिक,
नियतकालिके, टीव्ही न्यूज चॅनल इत्यादी) कार्यालये व त्यांची वाहने चालू राहतील.
११. पाणीपुरवठा करणाऱ्या खाजगी व सरकारी संस्था, साफसफाई करणाऱ्या संस्था,
त्यांच्या गाड्या व जनजागृती करणाऱ्या गाड्या दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या
संस्था, विद्युत पुरवठा करणाऱ्या संस्था व ऊर्जा विभाग, बँकिंग सेवा, आयटी सेवा ते
जीवनावश्यक पुरवठ्याशी निगडीत आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
या व्यतिरिक्त जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी विशेषतः
पुणे आणि मुंबई येथून येणाऱ्या नागरिकांना आवाहन केले आहे की, या जिल्ह्यात
आल्यानंतर त्यांनी स्वतःला Home Quarantine करून सोशल डिस्टंन्सिंग कटाक्षाने
पाळावे तसेच स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी.
00000
Comments
Post a Comment