सलग उत्पादन प्रक्रिया चालू असणाऱ्या कंपन्या,पेट्रोल पंप, इंधन तेल कंपनी व त्यांची गोदामे सुरु ठेवण्यास मुभा
अलिबाग,दि.25(जिमाका)- शासनाने करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी
राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि.13 मार्च, 2020 लागू केला आहे.
करोना विषाणूचा प्रादूर्भाव
रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून शासन निर्देशाप्रमाणे
औद्योगिक व खाजगी आस्थापनांमधील होणारी गर्दी टाळण्यासाठी औद्योगिक व खाजगी
आस्थापना दि.14 एप्रिल 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती निधी
चौधरी यांनी दिले आहेत.
या आदेशान्वये खाद्यपदार्थ, औषधे
वैद्यकीय उपकरणे, सलग उत्पादन प्रक्रिया चालू असणाऱ्या कंपन्या, पेट्रोल पंप, इंधन
तेल कंपनी व त्यांची गोदामे चालू राहणार आहेत.दि.14 एप्रिल 2020 पर्यंत बंद
असणाऱ्या औद्योगिक कंपन्यामधील व पेट्रोलियम पदार्थ, कच्चे खनिज तेल साठवणूक
करणाऱ्या गोदामांमधील यंत्र सामुग्री दुरुस्ती व देखभाल कंपनी परिसरात रखवाली व
साफसफाई करण्यासाठी कमीत कमी वाहने व ५०% किंवा त्यापेक्षा कमी कर्मचाऱ्यांना
कंपनीमध्ये प्रवेश देण्यास या आदेशान्वये मुभा देण्यात आली आहे, असे जिल्हा
प्रशासनाने कळविले आहे.
तसेच सुरू राहणाऱ्या सर्व
कंपन्यांच्या आस्थापनांनी कामावर उपस्थित होणाऱ्या सर्व कामगारांचे नियमितपणे
थर्मल स्क्रीनिंग करावे तसेच त्यांच्या बाबतीत सामाजिक दूरता (social distancing)
पाळावी,अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाकडून सुरू राहणाऱ्या सर्व कंपन्यांना देण्यात
आल्या आहेत.
0000
Comments
Post a Comment