निवडणूक कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावलेल्या पो.ह. श्रीकांत ठाकूर यांच्या वारस पत्नीला जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते रु.10 लाख सानुग्रह अनुदानाचा धनादेश सुपूर्द
वृत्त क्रमांक:-145 दि.09 एप्रिल 2020
अलिबाग,जि.रायगड.दि.09
(जिमाका) – जिल्हा परिषद व पंचायत समिती
सार्वत्रिक निवडणुका-2017 च्या वेळी पोलीस हवालदार श्रीकांत केशव ठाकूर हे ता.माणगाव, जि.रायगड येथे निवडणूक कर्तव्यावर
मतमोजणी दरम्यान बंदोबस्तावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावले होते. त्यांच्या
कुटुंबियांना आर्थिक सहाय्य मंजूरी मिळणेबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत
ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे सादर करण्यात आला होता.
ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र
शासन यांची या प्रस्तावास मान्यता मिळाली असून आज जिल्हाधिकारी कार्यालयात मयत पोलीस
हवालदार श्रीकांत केशव ठाकूर यांच्या कायदेशीर वारस पत्नी श्रीम.कल्पना श्रीकांत ठाकूर,
पो.कुसुंबळे,ता.अलिबाग यांना रुपये दहा लाखाचा
धनादेश जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
000000
Comments
Post a Comment