कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! दि.01 मार्च ते 08 एप्रिल दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांची माहिती जाहीर
वृ.क्र.146
दिनांक :- 09/04/2020
अलिबाग,दि.09 (जिमाका) : जे नागरीक दि.01 मार्च ते 08 एप्रिल 2020 दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतले आहेत, त्या
प्रवाशांबद्दलचा तपशिल जिल्हा प्रशासनाने कळविला आहे. तो पुढीलप्रमाणे-
एकूण परदेश प्रवासावरुन परतलेले व करोना ‘+’ ve नागरीकांच्या संपर्कात आल्याने निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची
संख्या - 1 हजार 718. निरीक्षणाखाली असलेल्या परंतू 14 दिवसांचा incubation
कालावधी पूर्ण केलेले नागरिक- 1 हजार 409, घरामध्ये अलगीकरणात (Home Quarantine)
असलेले नागरिक-271, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये (Institutional Quarantine) असलेले
नागरीक-21. सद्य:स्थितीत करोना ‘+’ ve असलेल्या नागरिकांची
संख्या-17, मुंबई फोर्टीज हॉस्पिटल, मुलूंड येथे विलगीकरण कक्षात दाखल नागरीक-01
असून त्याची तब्येतीची स्थिती गंभीर
आहे. उप जिल्हा रुग्णालय पनवेल येथे विलगीकरण
कक्षात दाखल असलेले नागरीक 10 असून यातील सर्व दाखल रुग्णांची तब्येतीची स्थिती
उत्तम आहे. नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालय, वाशी येथे विलगीकरण कक्षात दाखल
असलेल्या नागरिकांची संख्या-02
असून या नागरिकाच्या तब्येतीची स्थिती गंभीर आहे. सेव्हन हिल्स रुग्णालय, मुंबई
येथे विलगीकरण कक्षात दाखल असलेले नागरीक-2 असून दाखल रुग्णांच्या तब्येतीची
स्थिती उत्तम आहे. अंधेरी सरकारी रुग्णालय येथे विलगीकरण कक्षात दाखल असलेले
नागरीक-02 असून दाखल रुग्णांच्या
तब्येतीची स्थिती उत्तम आहे.
नागरिकांच्या
SWAB तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-
जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई
येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या-323, कस्तुरबा गांधी
रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात
आलेल्या नागरिकांची संख्या-36, SWAB तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या-287,
तपासणीअंती ‘-’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या-230, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित
असणाऱ्या नागरिकांची संख्या-36, तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या-21, सद्य:स्थितीत ‘+’ ve रिपोर्ट असलेल्या नागरिकांची संख्या-17, ‘+’ ve रिपोर्ट असलेले उपचारानंतर ‘-’ve रिपोर्ट आलेले नागरीक-04 अशी
माहिती जिल्हा प्रशासनाने कळविली आहे.
0000
Comments
Post a Comment