कोविड-19 उपाययोजनांसाठी ओएनजीसी उरण प्लान्ट प्रशासनाकडून इन्फ्रारेड थर्मामीटर,मास्क व हातमोजे वाटप




अलिबाग, जि. रायगड, दि.29 (जिमाका) : कोविड-19या साथीच्या आजाराची तपासणी व सर्वेक्षण करण्यासठी ओएनजीसी उरण प्लान्ट प्रशासनाकडून कंपनीच्या सीएसआर फंडामधून ओएनजीसी प्रतिनिधी श्री. जॉर्ज, वि.केव्हेट्टा व इकबाल शेख यांनी इन्फ्रारेड थर्मामीटर, मास्क व हातमोजे उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती निलम गाडे यांच्याकडे काल (दि.28)सुपूर्द केले.
            करोना या महामारीच्या काळात कोविड-19 विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून उरण तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी वाडी-वस्तीवर कोविड-19 विषाणू प्रतिबंधात्मक औषध फवारणी सुरु करण्यात आली आहे. तसेच ओनएनजीसी प्लान्ट् उरण प्रशासनाच्या वतीने ग्रामपंचायत वेश्वी कातकरवाडी,ग्रामपंचायत पुनाडे मधील कातकरवाडी, ग्रामपंचायत सारडेमधील बेलवाडी व ग्रामपंचायत रानसई मधील सर्व वाड्यांवर धान्य वाटपही करण्यात आले.
या महामारीच्या काळात ओएनजीसी उरण प्लान्ट् प्रशासनाकडून उरण तालुक्याकरिता दिलेल्या या बहुमोल सहकार्याबद्दल गटविकास अधिकारी श्रीमती निलम गाडे यांनी  ओएनजीसी उरण प्लान्ट प्रशासनाचे आभार मानले.  यावेळी सभापती सागर कडू, उपसभापती श्रीमती शुभांगी पाटील उपस्थित होते.
000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन