महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
वृत्त क्रमांक :- 243
दिनांक
:- 29 एप्रिल 2020
अलिबाग,जि.रायगड, दि.29 (जिमाका ) :- कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात महाराष्ट्र
दिन हा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याबाबत स्वयंस्पष्ट सूचना देण्यात आलेल्या
आहेत.
राज्यातील
मंत्रालय व सर्व जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालये या ठिकाणी एकाच वेळी सकाळी
8.00 वाजता फक्त ध्वजारोहण करण्यात यावे.
या ठिकाणी केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद एवढ्याच पदाधिकारी, अधिकारी यांनी उपस्थित रहावे.
इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येवू नये. कवायतीचे आयोजन करण्यात येवू नये.
विधीमंडळ,
मा.उच्च न्यायालय व इतर संविधानिक कार्यालयांमध्ये कमीत कमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात
यावे. ध्वजारोहण करणारे पालकमंत्री महोदय काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी
उपस्थित राहू न शकल्यास, जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहण करावे.
या सूचनांचे लक्षात घेऊन दि. 1 मे, 2020
रोजी सकाळी 8.00 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम
राज्याच्या उद्योग,
खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क
राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा कु.आदिती
तटकरे यांच्या हस्ते
जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे संपन्न होणार आहे.
000000
Comments
Post a Comment