जिल्ह्यातील 21 शिवभोजन केंद्रातून 2 हजार 142 थाळ्यांचा गरजू नागरिकांनी घेतला लाभ कोणताही गरजू नागरीक उपाशी राहणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन घेत आहे काळजी


वृत्त क्रमांक:-148                                                                                        दि.09 एप्रिल 2020




अलिबाग,जि.रायगड.दि.09 (जिमाका) – करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या दरम्यान नागरिकांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेसाठी, सोयी-सुविधांसाठी विविध नियम व उपाययोजना जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी लागू केले आहेत.
              मात्र या काळात कोणत्याही नागरिकाची उपासमार होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही  नागरिकाची उपासमार होणार नाही, याची जिल्हा प्रशासन सर्व तऱ्हेने काळजी घेत आहे. 
                 शासन निर्णय दि. 1 जानेवारी 2020 नुसार या योजनेंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या या शिवभोजन केंद्रावर दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक मूद भात व एक वाटी वरण समाविष्ट असलेली जेवणाची थाळी फक्त  5/- रुपयात लॉकडाऊनच्या काळात गरजू नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे,जिल्ह्यातील आजपर्यंत दि.09 एप्रिल रोजी 2 हजार केंद्रावरुन तब्बल 2 हजार 142 व्यक्तींनी या शिवभोजनाचा लाभ घेतला आहे. याबाबतचा संपूर्ण समन्वय जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके व सहा.जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.वाकडे हे यशस्वीपणे करीत आहेत. 
            तरी गरजू नागरिकांनी या शिवभोजन केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
*******

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन