पनवेल तालुक्यातील मौजे उलवे येथील सुयश पार्क वगळले Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) प्रतिबंधीत क्षेत्रातून



अलिबाग, जि. रायगड, दि.06 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल  तालुक्यातील मौजे उलवे येथील  सुयश पार्क, ई-विंग, प्लॉट नं.123-125 बी, सेक्टर-23, ही इमारत व त्याच्या आजूबाजूचा परिसर एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने हा परिसर करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस हे क्षेत्र Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले होते.
मात्र आता Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित केलेल्या क्षेत्राचा कालावधीला दि.4 जून 2020 रोजी 28 दिवस पूर्ण झाले असून या कंटेनमेंट झोनमध्ये एकही नवीन करोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही .
त्यामुळे हा परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) व प्रतिबंध क्षेत्रामधून वगळण्याचे जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आदेश दिले आहेत.
०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान