राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी महाडमधील मौजे नाते येथील जागा हस्तांतरित

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.24 (जिमाका) :- सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय महाड यांनी राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना नाते, ता.महाड, जि.रायगड या इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी केली होती. जिल्ह्याच्या पशूधन क्षेत्रातील विकासाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्वाची असल्याने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

त्यानुसार जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मौजे नाते, ता.महाड, जि.रायगड येथील गट नं.955 एकूण क्षेत्र 1-34-00 हेक्टर आर. पैकी 0-05-00 हे.आर.ही जमीन ग्रामपंचायत नाते यांच्याकडून शासनाकडे पूर्नग्रहण करण्यात येऊन महसूल मुक्त व सारामाफीने पशुसंवर्धन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना नाते, ता.महाड, जि.रायगड या इमारतीच्या बांधकामाकरिता हस्तांतरीत करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील पशूधन विकासाच्या दृष्टीने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या दूरदृष्टीमुळे हा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन