खालापूर तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र,सावरोलीसाठी मौजे सावरोली येथील शासकीय जागा हस्तांतरित

 


अलिबाग, जि.रायगड दि.28 (जिमाका):- खालापूर तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, सावरोली या इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

              या पार्श्वभूमीवर मौजे सावरोली ता.पोलादपूर येथील स.नं. 38/23, क्षेत्र 7-84-00 हे.आर. पैकी 0-05-00 हे. आर. ही जमीन भोगाधिकारी  मूल्यरहित व महसूल मुक्त किंमतीने नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, सावरोलीकरिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.

             खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे. 

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान