पेण तालुक्यातील विविध तलाठी कार्यालयांकरिता जागा हस्तांतरित महसूल प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे धडाडीचे निर्णय
अलिबाग,
जि.रायगड दि.6 (जिमाका):- तलाठी कार्यालय हे नागरिकांसाठी ग्रामीण स्तरावरील
अत्यंत महत्त्वाचे कार्यालय मानले जाते. या कार्यालयातून जनतेची महसूलविषयक सर्व
प्रकारची महत्त्वाची कामे केली जातात.
ग्रामीण भागातील जनतेची महसूलविषयक कामे सुलभ
व्हावीत, प्रशासन गतिमान व्हावे तसेच येथील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या व या
कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने या तलाठी कार्यालयाची
इमारत सुसज्ज व अद्ययावत असणे, ही काळाची गरज होती, या दृष्टीने पालकमंत्री या
नात्याने कु.आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष देण्यास सुरुवात केली.
या पार्श्वभूमीवर कामार्ली, उचेडे, आंबेघर,
शिर्की, पाबळ या तलाठी कार्यालयांच्या इमारतींच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी
केली होती. याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे
निर्देश दिले होते.
त्यानुसार तलाठी सजा कामार्लीसाठी क्षेत्र
0.04.00 हे.आर., उचेडे येथील तलाठी सजा कांदळेसाठी क्षेत्र 0.01.00 हे.आर.,तलाठी
सजा आंबेघरसाठी क्षेत्र 0.05.00 हे.आर., तलाठी सजा शिर्कीसाठी क्षेत्र 0.02.00
हे.आर.,तलाठी सजा पाबळसाठी क्षेत्र 0.0२.00 हे.आर. ही जमीन महसूल मुक्त व
सारामाफीने संबधित तलाठी कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी पालकमंत्री
कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी
चौधरी यांनी जारी केले आहेत.
यामुळे खऱ्या अर्थाने महसूल प्रशासन गतिमान
होऊन जनतेला महसूल विषयक सोयी सुविधा सुलभतेने मिळतील. विविध प्रशासकीय
कार्यालयांच्या नव्या इमारतीसाठी व अद्ययावतीकरणासाठी पालकमंत्री कु. आदिती तटकरे
करीत असलेल्या पाठपुराव्यामुळे प्रशासन निश्चितच गतिमान होण्यास मोठा हातभार
लागणार आहे.
यामुळे जिल्ह्यातील जनतेमध्ये पालकमंत्री
कु.आदिती तटकरे यांच्या कामाविषयी सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.
000000
Comments
Post a Comment