अलिबाग तालुक्यातील झिराड, आवास, रेवदंडा, कुरकुंडी कोलटेंभी, बामणगाव, बेलकडे, ताडवागळे व काविर या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

 


अलिबाग,जि.रायगड,दि.22 (जिमाका):-निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुषंगाने अलिबाग तालुक्यातील झिराड, आवास, रेवदंडा, कुरकुंडी कोलटेंभी, बामणगाव, बेलकडे, ताडवागळे व काविर या ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक दि.21 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. मा.राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी जाहिर केलेला निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :- नामनिर्देशनपत्र मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ-मंगळवार, दि.30 नोंव्हेंबर ते सोमवार दि. 06 डिसेंबर 2021 (दि.4 व 5 डिसेंबर 2021 या सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) , वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत.  नामनिर्देशन छाननी करण्याचा दिनांक व वेळ-मंगळवार, दि.07 डिसेंबर 2021, सकाळी 11.00 वा.पासून छाननी संपेपर्यंत, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दिनांक व वेळ-गुरुवार, दि.09 डिसेंबर 2021 दुपारी 3.00 वाजेपर्यंत, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक  व वेळ- गुरुवार, दि.09 डिसेंबर 2021 दुपारी 3.00 नंतर, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक-मंगळवार, दि.21 डिसेंबर 2021, सकाळी 7.30 वा. पासून ते सायं.5.30 वा.पर्यंत, मतमोजणीचा दिनांक-बुधवार, दि.22 डिसेंबर 2021, सकाळी 11.00 वा., जिल्हा कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाचा अधिसूचना प्रसिध्द करणे दि.27 डिसेंबर 2021  सोमवार पर्यंत.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन