दुधाळ जनावरांचा (गायी,म्हशी) पुरवठा योजनेंतर्गत पुरवठादार पॅनलमध्ये समाविष्ट होण्यासाठी इच्छुक पुरवठादारांनी अर्ज करावेत --जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर.व्ही.काळे
दुधाळ जनावरांचा (गायी,म्हशी) पुरवठा योजनेंतर्गत
पुरवठादार पॅनलमध्ये समाविष्ट होण्यासाठी इच्छुक पुरवठादारांनी अर्ज करावेत
अलिबाग,दि.12(जिमाका) :- दि.01 ऑगस्ट 2022 ते दि.31 जुलै 2023 या कालावधीत विशेष घटक व नाविन्यपूर्ण योजना व इतर योजनेंतर्गत दुधाळ जनावरांचा (गायी, म्हशी) पुरवठा करण्यासाठी जिल्हानिहाय पुरवठादारांचे पॅनल करण्यात येणार आहे. इच्छुक पुरवठादारांकडून यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
तरी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय इमारत, प्राणायाम हेल्थ समोर वरसोली रोड, रामनाथ, अलिबाग, दूरध्वनी क्रमांक 02141-228036 येथे तसेच तालुका पशुसंवर्धन कार्यालयाच्या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर.व्ही.काळे यांनी केले आहे.
0000000
Comments
Post a Comment