रायगड जिल्हा प्रशासनामार्फत कबड्डी चषक स्पर्धेचे आयोजन
अलिबाग,दि.12(जिमाका) :- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली बुधवार, दि. 14 डिसेंबर 2022 रोजी पी.एन.पी. महाविद्यालय, वेश्वी, अलिबाग येथील क्रीडांगणावर रायगड जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने कबड्डी चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कबड्डी चषक स्पर्धेत रायगड जिल्हा वरिष्ठ गट कबड्डी निवड चाचणी स्पर्धेतील प्रथम 16 पुरुष संघ आणि प्रथम 8 महिला संघ सहभागी होतील. कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन दि.14 डिसेंबर 2022 रोजी सकाळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी या क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे.
या स्पर्धेतील प्रावीण्य प्राप्त संघांना (प्रथम, द्वितीय आणि तृतीय) चषक, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
तरी या कबड्डी चषक स्पर्धेचा आनंद सर्व कबड्डी प्रेमी आणि क्रीडाप्रेमी नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.
00000000
Comments
Post a Comment