तळा येथील गो.म.वेदक माध्यमिक विद्यालयात मानवी हक्क दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न
अलिबाग, दि.12
(जिमाका) :- 10 डिसेंबर हा दिवस मानवी
हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. तहसिल कार्यालय, तळा यांच्या वतीने दि. 10
डिसेंबर 2022 रोजी गो.म.वेदक माध्यमिक विद्यालय, तळा येथे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क
दिनानिमित्त मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी तळा तहसिल कार्यालयाचे
निवासी नायब तहसिलदार श्री. मंगेश पालांडे यांनी उपस्थितांना मूलभूत मानवी हक्क व अधिकारांविषयी
मार्गदर्शनपर संबोधन केले. तसेच मार्गदर्शन करीत असताना विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरे
करीत विद्यार्थ्यांनाही चर्चेत सहभागी करून घेतले. यास विद्यार्थ्यांचाही उत्साही प्रतिसाद
लाभला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.कदम यांनी
केले. यावेळी समाजशास्त्र विषयाचे शिक्षक श्री. राठोड, श्री. सुतार आणि श्री. दौडमणी
यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने
श्री. सुतार यांनी तळा तहसील प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
000000
Comments
Post a Comment