डाक अदालतीचे 29 मार्च रोजी आयोजन


 

अलिबाग,दि.14(जिमाका):- अधीक्षक डाकघर रायगड विभाग,अलिबाग कार्यालयाद्वारे दि.29 मार्च 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

             या डाक अदालतीमध्ये रायगड विभागातील डाक सेवेसंबंधित तक्रार/समस्या ज्याचे निवारण 6 आठवडा कालावधीत झालेले नाही, अशा टपाल, स्पीडपोस्ट, काऊटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील.  तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक,ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इ.असणे आवश्यक आहे.

             इच्छुक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतीत अधीक्षक डाकघर रायगड विभाग येथे दि.28 मार्च 2023 पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी, असे अधीक्षक डाकघर रायगड विभाग श्री.डॉ.संजय लिये यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

भारतीय संविधान -आमचा अभिमान