जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता

 

अलिबाग,दि 21(जिमाका :- रायगड व रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यातील पुणे,सातारा आणि नंदुरबार या जिल्ह्यात येत्या चार तासात विजांच्या कडकडाटसह वादळी पाऊस पडेल, असा अंदाज मुंबई येथील वेधशाळेने व्यक्त केला आहे.

            या कालावधीत वर नमूद केलेल्या जिल्ह्यांमध्ये काही तुरळक ठिकाणांवर  ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारा वाहण्याची शक्यता  असल्याचे हवामान वेधशाळेने कळविले आहे.

            तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

भारतीय संविधान -आमचा अभिमान

कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ होम टेस्ट किट किंवा रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे चाचणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन